khabarbat

While voting for the Delhi Assembly was underway on Wednesday, the BJP won a total of 215 seats in the state unopposed, even before the local body elections in Gujarat.

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

Gujrat local bodies election | दिल्लीत मतदान सुरु असताना भाजपने जिंकल्या २१५ जागा

गांधीनगर : News Nework
दिल्ली विधानसभेसाठी बुधवारी मतदान होत असतानाच, तिकडे गुजरातमधून निवडणुकीशी संबंधित एक मोठी बातमी आली. गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच भाजपला राज्यात एकूण २१५ जागांवर बिनविरोध विजय मिळाला. भाजपने हलोल, भचाऊ, जाफराबाद आणि बाटवा या चार नगरपालिकांमध्येही बिनविरोध विजयाचा दावा केला. या जागांवर १६ फेब्रुवारीला मतदान होणार होते. मात्र, विरोधकांनी मैदान सोडल्याने भाजप आधीच विजयी झाला.

While voting for the Delhi Assembly was underway on Wednesday, the BJP won a total of 215 seats in the state unopposed, even before the local body elections in Gujarat.
While voting for the Delhi Assembly was underway on Wednesday, the BJP won a total of 215 seats in the state unopposed, even before the local body elections in Gujarat.

गुजरात राज्य निवडणूक आयोगाने जुनागढ महानगरपालिका, ६६ नगरपालिका, तीन तालुका पंचायती (कठलाल, कापडवंज आणि गांधीनगर) आणि काही इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ४ फेब्रुवारी होती. या काळात भाजप उमेदवारांनी चार नगरपालिकांमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने जागा जिंकल्या की, तेथील सर्व नगरपालिकाच भाजपच्या ताब्यात आल्या.

भाजपने दिलेल्या माहितीनुसार, पक्षाने हलोलमधील ३६ पैकी १९ जागा, भचौमधील २८ पैकी २२, जाफराबादमधील २८ पैकी १६, बांटवामधील २४ पैकी १५ जागा न लढवताच जिंकल्या आहेत. याशिवाय, इतरही काही जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.

भाजपने पंचायत पातळीवरही बिनविरोध विजय मिळवला. पंचमहल जिल्ह्यात शिवराजपूर जिल्हा पंचायत आणि सेहरा तालुका पंचायतीच्या मंगलिया जागेवर भाजप उमेदवार बिनविरोध विजयी झाले. येथे काँग्रेस आणि आपच्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले होते. दरम्यान, गुजरातमधील जुनागढ महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका आहे, जेथे निवडणुका होणार आहेत. येथे एकूण ६० जागांसाठी निवडणुका होत आहेत, यांपैकी भाजपने आधीच ९ जागा जिंकल्या आहेत. या जागांवर विरोधी पक्षांनी आपले उमेदवार उतरवले नाहीत.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »