नवी दिल्ली : khabarbat News Network
Delhi election2025 survey | दिल्लीत प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या आहेत. जुन्या प्रचाराप्रमाणे आता कंदील प्रचार सुरु होणार आहे. दिल्ली निवडणुकीत लोकांचा कल कोणाकडे आहे, याबाबतचा सीव्होटरचा (C Voter) अंदाज समोर आला आहे. यात फारसा फरक दिसत नाही, असे असताना भाजपा (BJP) दिल्लीतील सत्ता काबीज करण्यासाठी उत्सुक आहे, तर ‘आप’ला किल्ला टिकवायचा आहे. (delhi election update)

यावेळी माझ्या अंदाजानुसार दिल्लीत ५५ जागा मिळत असल्याचा दावा केजरीवाल (kejriwal) यांनी केला आहे. परंतू जर माता-भगिनींनी जोराचा धक्का दिला तर त्या ६० वरही जाऊ शकतात, असे केजरीवाल म्हणाले. सायंकाळी पाच वाजता प्रचार संपल्यानंतर केजरीवाल यांनी हा दावा केला आहे. (AAP)
आपली, सरकार बदलण्याची इच्छा आहे का? असा प्रश्न सी व्होटरने (delhi election survey report) दिल्लीतील मतदारांना विचारला असता १ फेब्रुवारीपर्यंतच्या ट्रॅकरनुसार, या प्रश्नावर उत्तर देताना, विद्यमान सरकारच्या कामावर आपण नाराज आहोत आणि यावेळी बदलाची इच्छा असल्याचे ४३.९ टक्के लोकांनी म्हटले आहे. तसेच, १०.९ टक्के लोकांचे म्हणणे आहे की, ते नाराज आहेत, पण सरकार बदलण्याची इच्छा नाही. तसेच, ३८.३ टक्के लोकांचे म्हणणे आहे की, आपण सरकारच्या कामकाजावर नाराज नाही यामुळे बदलही करू इच्छित नाही. (delhi election latest news)