रहिमयार खान : News Network

Maha Kumbh in Pakistan | प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याची चर्चा जगभरात सुरू आहे. कुंभमेळ्यात जगभरातील कोट्यवधी भाविक गंगास्रान करत आहेत. मात्र, पाकिस्तानातील हिंदूंना व्हिसा संबंधीत समस्येमुळे या कुंभमेळ्यात सहभागी होता येत नाही. यामुळे पाकिस्तानातील हिंदू बांधवांनी आपला एक वेगळा कुंभमेळा (kumbh mela)आयोजित केला आहे. यात गंगेच्या पाण्याने स्नान करून ते आपला भाव प्रकट करत आहेत.
पाकिस्तानी युट्यूबर हरचंद राम (Harchand Ram) याने आपल्या ब्लॉगमध्ये या अनोख्या आयोजनाची झलक दाखवली आहे. रहीमयार खान जिल्ह्यात झालेल्या या कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या एका पुजा-याने, आम्ही भारतातील प्रयागराज येथे जाऊ शकत नाहीत. यामुळे आम्ही येथेच महाकुंभचे सेलिब्रेशन केले. जो १४४ वर्षांनंतर आला आहे आणि कदाचित आमच्या आयुष्यातील अखेरचा कुंभमेळा असेल. महाकुंभमेळ्यात गंगास्रानाचे विशेष महत्व आहे. मात्र, पाकिस्तातील हिंदूंना भारतात जाऊन गंगा स्रान करणे अवघड आहे. यामुळे भारतातून गंगेचे पाणी आणून ते येथील पाण्यात टाकण्यात आले आहे.
पाकिस्तानात कुंडस्रान विधी : पाकिस्तानात गंगा नदीच्या पाण्यात आंघोळीसाठी एक तलाव बांधण्यात आला आहे, त्यातील पाण्यात गंगेचे पाणी टाकण्यात आले आहे. भाविक त्यात उभे राहून स्रान करत आहेत. त्यांना गंगास्रानाचा अनुभव घेता यावा, यासाठी पुजारी त्यांच्या अंगावर गंगाजल प्रोक्षण करीत आहेत.
भाविकांसाठी प्रसाद वितरण : स्रानानंतर भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्थाही करण्यात आली. सर्वांसाठी खिचडी तयार करण्यात आली होती. जी नंतर सर्वांना प्रसाद रुपात वितरित करण्यात आली.