वॉशिंग्टन : News Network
अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कोणतीही कपात केलेली नाही. सलग तीन वेळा दर कमी केल्यानंतर सेंट्रल बँकेने यावेळी कोणताही निर्णय घेतला नाही. दरम्यान, फेडच्या दरात कपात न करण्याच्या निर्णयाचा परिणाम जगभरातील अब्जाधीशांच्या संपत्तीवरही दिसून येत आहे. फ्रान्सपासून अमेरिकेपर्यंतच्या अब्जाधीशांच्या संपत्तीत घट झाली आहे. (federal bank)

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या अहवालानुसार, यूएस सेंट्रल (US central bank) बँकेच्या निर्णयानंतर अब्जाधीशांच्या संपत्तीत घट झाली आहे. निर्देशांकानुसार, या निर्णयानंतर फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड अर्नाल्ट आणि इलॉन मस्क यांच्या संपत्तीत घट झाली आहे. फेडच्या या निर्णयानंतर बर्नार्ड अर्नाल्टला सर्वाधिक नुकसान सोसावे लागले आहे. ब्लूमबर्ग (Bloomberg) इंडेक्सनुसार, त्यांना सर्वाधिक ९.५५ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. त्यांची एकूण संपत्ती आता १९७ अब्ज डॉलर्स आहे.
यूएस सेंट्रल बँकेच्या निर्णयानंतर अमेरिकेतील दिग्गज उद्योगपती एलन मस्क (Elon Musk) यांच्या संपत्तीत ७.१२ अब्ज डॉलरची घट झाली आहे. निर्देशांकानुसार त्यांची एकूण संपत्ती आता ४२१ अब्ज डॉलर्स आहे. तसेच फ्रेंच उद्योगपती फ्रँकोइस बेटेनकोर्ट मेयर्स यांच्या संपत्तीत २.२५ अब्ज डॉलरची घट झाली आहे. फेडच्या घोषणेनंतर, अमेरिकन उद्योगपती लॅरी एलिसन, स्टीव्ह बाल्मर आणि बॉब दुग्गन यांच्या निव्वळ संपत्तीमध्ये घट झाली आहे.