khabarbat

A medically surprising incident took place two days ago at Buldhana District General Hospital. A 32-year-old pregnant woman was diagnosed with another fetus in her womb.

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

Fetus : गर्भातही आढळला गर्भ; भारतातील १५ वे प्रकरण

 

बुलढाणा : प्रतिनिधी
वैद्यकीय क्षेत्रात आश्चर्यकारक मानली जाणारी घटना दोन दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात घडली आहे. ३२ वर्षीय गर्भवती महिलेच्या गर्भात आणखी एक गर्भ असल्याचे निदान झाले. वैद्यकीय भाषेत याला ‘फीटस इन फीटू’ असे म्हणतात.

A medically surprising incident took place two days ago at Buldhana District General Hospital. A 32-year-old pregnant woman was diagnosed with another fetus in her womb.
A medically surprising incident took place two days ago at Buldhana District General Hospital. A 32-year-old pregnant woman was diagnosed with another fetus in her womb.

दोन दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखालील एका गर्भवती महिलेने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले. तिची सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टरांना मोठा धक्का बसला. सोनोग्राफी करणारे डॉ. प्रसाद अग्रवाल यांनी निरीक्षणादरम्यान वारंवार तपासणी केली; आणि स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील यांना माहिती दिली.

१९८३ मध्ये समोर आली पहिली घटना
सोनोग्राफीमध्ये गर्भवती महिलेच्या पोटातील गर्भात आणखी एक गर्भ असल्याचे स्पष्ट दिसत होते. ३५ आठवड्यांहून अधिक वयाच्या या गर्भामध्ये काही हाडे आणि गर्भासारखी रचना दिसून आली. महिलेचे नऊ महिने पूर्ण झाल्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी तिला छत्रपती संभाजीनगर येथे पाठविण्यात आले आहे, जिथे तिची प्रसूती तज्ज्ञांच्या देखरेखीखाली होईल. १९८३ मध्ये या प्रकारची पहिली घटना जगभरात समोर आली होती. आतापर्यंत अशी सुमारे २०० प्रकरणे नोंदविली गेली आहेत. भारतात मात्र अशा १५ घटना घडल्या आहेत.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »