मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील तीन ते सहा वयोगटातील तब्बल ३२ लाख ४९ हजार मुलं खाजगी बालवाडीत शिक्षण घेत आहेत. मात्र, या संस्थांवर सरकारचे कोणतेही नियंत्रण नसल्याने या प्ले ग्रुप्स पार्किंगच्या जागेत, घरामध्ये किंवा इतर ठिकाणी भरवले जात आहेत. शहरांत गल्लोगल्ली भरवल्या जाणा-या बालवाड्यांच्या नियमावलीसाठी राज्य सरकारच्या हालचालींना सुरुवात झाली असून राज्य शासन याबाबत काय धोरण निश्चित करते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हे पण वाचा…. Eknath Shinde Upset | एकनाथ शिंदे २० वर्षात ९ वेळा नाराज, पोहोचले दरेगावात!
या बालवाड्यांमध्ये मुलांसाठी असणारे शैक्षणिक अभ्यासक्रम, दुपारचा खाऊ आणि राज्य सरकारच्या विविध योजना राबवल्या जात नाहीत. यामुळे अनेक पालकांची चिंता वाढली आहे. यावर उपाय म्हणून शालेय शिक्षण विभागाने या खाजगी बालवाड्यांना सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी नियमावली तयार करण्याचे काम सुरू केले आहे.
हे पण वाचा…. New Jobs | १७० मिलियन नव्या नोक-या बाजारात येणार…
लवकरच खासगी प्ले ग्रूपवर सरकारचं नियंत्रण येणार आहे. राज्यातील तीन ते सहा वयोगटातील मुलांसाठी पूर्वप्राथमिक शिक्षणाला अधिक महत्त्व दिले जात आहे. या वयातील शिक्षण आता औपचारिक शिक्षणाचा भाग होणार आहे. सध्या महिला व बालकल्याण विभाग, शालेय शिक्षण विभाग आणि एकात्मिक बालविकास सेवा विभाग यापैकी कोणता विभाग या बालवाड्यांवर नियंत्रण ठेवेल, हे निश्चित करण्यात आलेले नाही. मात्र, या निर्णयामुळे मुलांना दर्जेदार शिक्षण मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.