khabarbat

The connection of MD drug smugglers in Chhatrapati Sambhaji Nagar (Aurangabad) has been revealed. Sheikh Naeem Sheikh Jamir (Resident Silk Milk Colony), who was making drugs easily available to students by getting them addicted, was arrested by the NDPS team on Tuesday.

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

MD | संभाजीनगरात विद्यार्थ्यांना ‘एमडी’ पुरवणारा पेडलर अटकेत

 

संभाजीनगर : विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगरातील (औरंगाबाद) एमडी (MD Drugs) ड्रग्ज तस्करांचे कनेक्शन निष्पन्न झाले आहे. विद्यार्थ्यांना ड्रग्जचे व्यसन लावून ते सहज उपलब्ध करुन देणा-या शेख नईम शेख जमिर (रा. सिल्क मिल्क कॉलनी) याला एनडीपीएस पथकाने मंगळवारी अटक केली.

अंमली पदार्थांची विक्री करणा-या गुन्हेगारांची एनडीपीएस पथकाने पुन्हा एकदा तपासणी मोहीम सुरू केली आहे. निरीक्षक गीता बागवडे यांच्या सुचनेवरुन उपनिरीक्षक अमोल म्हस्के याबाबत शोध घेत असताना नईमने नुकतेच मुंबईवरुन विक्रीसाठी ड्रग्जची तस्करी केल्याची माहिती मिळाली. अंमलदार लालखान पठाण, महेश उगले, सतिश जाधव, विजय त्रिभुवन, संदिपान धर्मे, नितेश सुंदर्डे यांनी मंगळवारी रात्री उशिरा त्याच्या घरावर छापा टाकला. त्यात त्याच्याकडे १ किलो १८० ग्रॅम गांजा, २.२५ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. छाप्यापुर्वीच बहुतांश माल त्याने विक्री केला होता.

नईमवर यापुर्वी अंमली पदार्थांचे अनेक गुन्हे दाखल आहेत. मात्र, जामिनावर सुटताच तो पुन्हा तस्करी सुरू करतो. मुंबईच्या मुख्य पेडलरकडून आणून शहरात दामदुप्पट दराने ड्ग्जची विक्री करतो. पोलिस मात्र एकदाही त्याच्या मुंबईच्या नेटवर्क पर्यंत पोहोचू शकलेले नाहीत.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »