khabarbat News Network
मुंबई : बांधकाम क्षेत्रातील नावाजलेली कंपनी लोढा समुह यांच्यातील व्यावसायिक वाद समोर आला आहे. अभिनंदन लोढा यांनी लोढा ब्रँडचा लोगो वापरू नये अशी मागणी करत मोठा भाऊ अभिषेक लोढा यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. अभिषेक लोढा यांच्या मालकीच्या मॅक्रोटेक डेव्हलपर्स कंपनीने धाकटा भाऊ अभिनंदन लोढाच्या हाऊस ऑफ अभिनंदन लोढा या कंपनीविरोधात याचिका दाखल केली आहे. लोढा ब्रँडचा लोगो आणि स्वामित्व हक्क मॅक्रोटेक डेव्हलपर्सकडे असल्याचा दावा अभिषेक लोढा यांनी याचिकेत केला आहे.

मॅक्रोटेक डेव्हलपर्सने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, २००८ ते २०१४ या काळात कंपनी कर्जात बुडाली होती ज्यामुळे कुटुंबात तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी कुटुंबातील प्रत्येक सदस्य संपत्ती आणि कर्ज या दोन्हीचा एक हिस्सा घेईल यावर सहमती बनली. परंतु तेव्हा अभिनंदनने इतके जास्त ग्राहक, कर्ज आणि बांधकाम व्यवसाय करण्यास नकार दिला. तेव्हा केवळ रक्कम घेण्यास प्राधान्य दाखवले. त्यामुळे अभिषेक आणि त्याच्या आई वडिलांवर २० हजार कोटी कर्ज होते तर अभिनंदनला १ हजार कोटी भरपाई देत नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी वेगळे करण्यात आले.
आता मॅक्रोटेक डेव्हलपर्स कंपनी शेअर बाजारात चांगली कामगिरी करत असून कंपनीच्या शेअर्स दरातही वाढ झाली आहे. जेव्हा ही कंपनी मजबूत व्हायला लागली तेव्हा अभिनंदन लोढाने रिअल इस्टेट व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला त्याने लोढा ब्रँडचा वापर करण्याचा प्रयत्न केला परंतु अभिषेक लोढा यांनी मज्जाव केला. तरीही अभिनंदन लोढा यांनी हाऊस ऑफ अभिनंदन लोढा रिब्रॅन्डिंग करून लोढा ट्रेडमार्क वापरण्यास सुरू ठेवले त्यामुळे हे कायदेशीर पाऊल अभिषेकने उचलले आहे.