khabarbat

Eknath Shinde was seen to be upset 9 times in his 20-year political career from 2005 to 2025. He was first upset in 2005.

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

Eknath Shinde Upset | एकनाथ शिंदे २० वर्षात ९ वेळा नाराज, पोहोचले दरेगावात!

 

 khabarbat News Network
मुंबई : सन २००५ ते २०२५ या २० वर्षांच्या राजकीय कारकि­र्दीत एकनाथ शिंदे ९ वेळा नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. सर्वप्रथम ते २००५ मध्ये नाराज झाले होते. त्यांच्यावर २००५ साली शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर महापौर पदाच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा होती. तेव्हा महापौर पदाचा मान हा राजन विचारे यांना मिळाला होता.

सन २००६ साली शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्यावर ठाणे जिल्हा संपर्क नेते ही जबाबदारी देण्यात आली होती. त्यावेळी देसाई यांच्या या नियुक्तीने एकनाथ शिंदे हे नाराज झाले होते. त्यावेळी तेव्हाचे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी २००७ ला महापालिका निवडणुकीच्या तोंडावर देसाई यांची नियुक्ती रद्द केली. पुढे २००९ ला ठाणे आणि कल्याण असे शिवसेनेत दोन स्वतंत्र जिल्हाप्रमुख नेमण्यात आले. तेव्हा जिल्हाप्रमुखपदाच्या झालेल्या विभागणीवरना एकनाथ शिंदे हे नाराज होते.

२०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा युती तुटली. त्यावेळी, विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद हे एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आले. मात्र, अवघ्या एका महिन्यातच शिवसेना ही भाजपा बरोबर राज्यातील सत्तेत सहभागी झाली. सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद हे एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आले. परंतु उपमुख्यमंत्री पद न मिळाल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याचे बोलले जात होते.

Eknath Shinde Upset | एकनाथ शिंदे २० वर्षात ९ वेळा नाराज, पोहोचले दरेगावात!
Eknath Shinde Upset | एकनाथ शिंदे २० वर्षात ९ वेळा नाराज, पोहोचले दरेगावात!

२०१९ मध्ये घडलेल्या राजकीय उलथा-पालथीमध्ये शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर राज्यात सरकार स्थापन केले. महाविकास आघाडीच्या या सरकारमध्ये सुरुवातीला मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात येईल अशी चर्चा होती. मात्र, तेव्हा मुख्यमंत्री पदावर स्वत: खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विराजमान झाले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारल्यामुळे तेव्हा एकनाथ शिंदे हे नाराज होते.

२०२२ ला झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी शिवसेना पक्षाकडून एकनाथ शिंदे यांना निवडणूक रणनीती पासून लांब ठेवण्यात आले. या घटनेनंतर एकनाथ शिंदे यांची नाराजी वाढतच गेली. त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसानंतरच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या निकालाच्या रात्री एकनाथ शिंदे यांचे ऐतिहासिक असे बंड झाले.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेला किती जागा मिळाव्या यावरून चर्चा सुरू असताना देखील एकनाथ शिंदे शेवटपर्यंत १५ जागांसाठी अडून होते. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी देखील जास्त जास्त जागा मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे शेवटपर्यंत वाटाघाटी करतच होते. या दोन्ही निवडणुकांच्या जागा वाटपावरून शिंदे नाराज असल्याची जोरदार चर्चा होती. अनेक दिवस चर्चेत गेल्यानंतर उपमुख्यमंत्री पद तरी एकनाथ शिंदे स्वीकारणार का? याबाबत अगदी शपथ विधीच्या काही तास आधी पर्यंत शिंदे नाराज असल्याने उपस्थित राहणार नाहीत अशी चर्चा होती. मात्र, शेवटी ते उपस्थित राहिले आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या काळात ते अनेकवेळेस अचानक गावी जाऊन बसले. त्यामुळे त्यांची नाराज उघड होत होती.

पालकमंत्रीपदावरुन नाराजी
दरम्यान, आता पालकमंत्रीपदांच्या वाटपानंतर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे नाराज झाल्यामुळे आपल्या दरे या मूळगावी गेले आहेत. तर, शिंदेंच्या नाराजीनंतर २ जिल्ह्यातील पालकमंत्रीपदांच्या नावांना स्थगिती देण्यात आली आहे. एकूणच, गेल्या १९ वर्षांतील राजकीय कार्यकाळात एकनाथ शिंदे ९ वेळा नाराज झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »