khabarbat

A sleeper cell of the terrorist organization Jamaat-e-Islami of Bangladesh is operating in 20 districts of the Maharashtra, including Mumbai.

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

Bangladeshi terrorist | बांगलादेशी दहशतवाद्यांचा २० जिल्ह्यात स्लिपर सेल

राज्यातील गुप्तचर विभागाकडून रोहिंग्या, बांगलादेशींचा शोध

नवी दिल्ली : khabarbat News Network
(Bangladeshi) आता बांगलादेशी आणि रोहिंग्या (rohingya) रडारवर असून, केंद्रीय गुप्तचर खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह महाराष्ट्रात बांगलादेशच्या जमात-ए-इस्लामी, या दहशतवादी संघटनेचे स्लीपर सेल कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. या स्लीपर सेलचं नेटवर्क राज्यातील तब्बल २० जिल्ह्यांमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे केंद्रीय गुप्तचर (CBI) खात्यासह, राज्यातील गुप्तचर यंत्रणा आणि पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. तपास यंत्रणा सक्रिय झाली असून, युद्धपातळीवर रोहिंग्या आणि बांगलादेशींचा शोध सुरू आहे.

महाराष्ट्रातील जवळपास २० जिल्ह्यांमध्ये बनावट जन्म प्रमाणपत्र आणि दाखले वितरीत झाले असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. राज्यात जवळपास दीड ते दोन लाख बांगलादेशी घुसखोर असू शकतात, असा तपास यंत्रणेचा अंदाज आहे. या घुसखोरांना मदत करणारे स्थानिक आणि प्रशासनातील अधिकारी देखील आता सरकारच्या रडारवर असणार आहेत.

अभिनेता सैफ अली (saif ali khan) खानवर बांगलादेशी घुसखोरांकडून झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच केंद्रीय गृह मंत्रालयाच्या या आदेशाने घुसखोरांच्या विरोधातील कारवाईला वेग येण्याची शक्यता आहे. राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी २८ नोव्हेंबर २०२४ रोजी गृहमंत्री अमित (Amit Shah) शहा यांना लिहिलेल्या निवेदनात टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) या संस्थेकडून घुसखोरांविषयी केलेल्या सर्वेक्षणाचा उल्लेख केला होता. शेवाळे यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने केलेल्या सर्वेक्षणानुसार, मुंबईत बांगलादेशी आणि म्यानमारमधून आलेल्या घुसखोरांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »