khabarbat

On Tuesday, the Nifty fell to a 6-month low, with the index falling below 23,000 intra day. Nifty and Sensex fell by 1.5%.

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

Nifty | बँकिंग, आयटीमध्ये घसरण; ७ लाख कोटी रुपये पाण्यात

khabarbat News Network
मुंबई : मंगळवारचा दिवस (२१ जानेवारी) शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी ‘अमंगळ’ ठरल्याचे दिसत आहे. आठवड्याच्या दुस-या दिवशी बाजारात पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळत आहे. मंगळवारी (Nifty) निफ्टी ६ महिन्यांतील नीचांकी पातळीवर म्हणजे निर्देशांक (index) इंट्राडे २३,००० च्या खाली घसरला. निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये १.५% ची घसरण दिसून आली.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये विक्री दिसून आली. (BSE) बीएसईच्या सर्व सेक्टर इंडेक्समध्ये विक्री दिसून आली. रिअ‍ॅल्टी, एनर्जी आणि पीएसई (PSE) शेअर्समध्ये घसरण झाली. (Auto) ऑटो, बँकिंग आणि आयटी (IT) समभागांमध्ये विक्री झाली.

मंगळवारी दिवसभराच्या कामकाजानंतर (sensex) सेन्सेक्स १,२३५ अंकांनी घसरला आणि ७५,८३८ वर बंद झाला. निफ्टी ३२० अंकांनी घसरून २३,०२५ वर बंद झाला. निफ्टी बँक ७८० अंकांनी घसरून ४८,५७१ च्या पातळीवर बंद झाला. निफ्टीचा (midcap) मिडकॅप निर्देशांक १,२७१ अंकांनी घसरला आणि ५३,८३५ वर बंद झाला.

कमकुवत बाजारपेठेतही, सकारात्मक ब्रोकरेजच्या आधारे अपोलो हॉस्पिटल्स २% वाढीसह बंद करण्यात यशस्वी झाले. क्रूडच्या हालचालीचा परिणाम तेल विपणन कंपन्यांवरही दिसून आला. एचपीसीएल आज ३% वाढीसह बंद झाला. (Zomato) झोमॅटोच्या तिस-या तिमाही निकालानंतर शेअर्सवर दबाव आला. झोमॅटो आज १०% खाली बंद झाला.

परकीय गुंतवणूकदारांचा दगा
एफआयआय (FII) च्या विक्रीचा परिणाम पुन्हा एकदा दिसून आला असून प्रमुख निर्देशांक १-२% नी घसरले. बाजारातील एका शेअरच्या वाढीनंतर ४० शेअर्समध्ये घसरण झाली. या घसरणीसह, ‘बीएसई’वर सूचीबद्ध असलेल्या सर्व कंपन्यांच्या एकूण बाजार भांडवलात ७ लाख कोटींची घट झाली आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »