khabarbat

The country's first electric water taxi will run in Mumbai. This taxi service will operate between Gateway of India and Jawaharlal Nehru Port Trust (JNPT).

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

e-water taxi | देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी सेवा मुंबईत!

 

khabarbat News Network
मुंबई : देशातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी (electric water taxi) मुंबईत धावणार आहे. गेटवे ऑफ इंडिया ते जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट (JNPT) दरम्यान ही टॅक्सी सेवा चालवण्यात येणार आहे. जेएनपीटी कर्मचा-यांच्या वाहतुकीसाठी ही सेवा लाभदायी ठरणार आहे.

माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेड (MDL) आणि जेएनपीटी (JNPT) यांच्यातील करारानंतर ही सेवा पुढील महिन्यापासून नियमितपणे सुरू केली जाणार आहे. हा एक नवीन वाहतूक पर्याय असणार आहे, जो मुंबईतील वाढती वाहतूक समस्या सोडवण्यास मदत करू शकेल. जलमार्गांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल म्हटले जात आहे.

India’s first electric water taxi will run in Mumbai. This taxi service will operate between Gateway of India and JNPT.

सुरुवातीला ही इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी परदेशातून आणण्याचा विचार होता. मात्र, माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेडने (MDL) स्वत:च इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी तयार करण्याचा निर्णय घेतला. तसेच, इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सीची निर्मितीही यशस्वी पूर्ण केली आहे.

इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सीची खासियत
या इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सीची लांबी १३.२७ मीटर आहे, तर रुंदी ३.०५ मीटर आहे. या इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सीची आसन क्षमता २५ प्रवाशांची आहे. तसेच, यामध्ये ६४ किलोवॅटची बॅटरी आहे. ही इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी एकदा चार्जिंग केल्यावर ४ तास चालू शकते. टॅक्सीचा वेग १४ नॉट्सपर्यंत असणार आहे. याशिवाय, या इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सीत वातानुकूलित सुविधा उपलब्ध असणार आहे. ज्यामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »