khabarbat News Network
नवी दिल्ली : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अहवालानुसार, येत्या काही वर्षांत ९२ मिलियन नोक-या संपुष्टात येऊ शकतात. तर १७० मिलियन नव्या नोक-या बाजारात येतील. याच बरोबर १०९० मिलियन नोक-या लेबर मार्केटमध्ये टिकून राहू शकतात. संपुष्टात येणा-या ९२ मिलियन नोक-यांमध्ये १५ सेक्टर्समध्ये सर्वाधिक नोक-या संपुष्टात येण्याची भीती आहे. जर आपणही या क्षेत्रांमध्ये काम करत असाल तर आपल्यासाठीही येणारा काळ कठीन असू शकतो. या लोकांना दुसरा पर्याय निवडण्याची आवश्यकता पडू शकते.

या क्षेत्राला सर्वाधिक धोका : वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या अहवालात ज्या १५ क्षेत्रांना धोका सांगण्यात आला आहे, ती खालीलप्रमाणे …
– कॅशियर अँड टिकीट क्लर्क
– अॅडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टन्ट
– बिल्डिंग केअर टेकर्स, क्लिनर्स आणि हाउसकीपर्स
– स्टॉक किपिंग क्लर्क
– प्रिटिंग आणि त्याच्याशी संबंधित वर्कर्स
– अकाउंटिंग, बुककीपिंग आणि पेरोल क्लर्क
– अकाउंटन्ट्स आणि ऑडिटर्स
– ट्रांसपोर्टेशन अटेंडन्ट्स आणि कंडक्टर्स
– सिक्योरिटी गार्ड्स
– बँक टेलर्स आणि त्याच्याशी संबंधित क्लर्क
– डेटा एंट्री वर्कर
– क्लायंट इंफोर्मेशन अँड कस्टमर सर्व्हिस वर्कर
– ग्राफिक डिझाइनर्स
– बिझनेस सर्व्हिसेज अँड एडमिनिस्ट्रेशन मॅनेजर्स
– इंवेस्टिगेटर्स
सर्वाधिक मागणी असणारे क्षेत्र : येणा-या पाच वर्षांत टेक्निकल स्किल्स सर्वाधिक महत्वाचे ठरतील. यांत, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि बिग डेटा, नेटवर्क आणि सायबर सिक्योरिटी, टेक्नॉलॉजिकल लिटरेसी, टेक्निकल स्किल्स. याशिवाय उमेदवारांमध्ये क्रिएटिव्ह थिंकिंग आणि सहनशीलताही आवश्यक असेल.
काळाच्या ओघात अनेक उद्योग-धंदे, नोक-या, संपुष्टात येत असतात आणि त्यांची जागा इतर नवे उद्योग-धंदे आणि नोक-या घेत असतात. अनेक नव्या क्षेत्रांमध्ये लोकांची मागणी वाढते. आता २०२५ से २०३० या कालावधीतही काहीसे असेच होण्याची शक्यता आहे आणि काही क्षेत्रांत नोक-या मोठ्या प्रमाणावर कमी होतील.