नवी दिल्ली : khabarbat News Network
आयकर विभागाने मोठ्या प्रमाणात खोटे परतावा दावे करणा-या कर्मचा-यांबाबत धक्कादायक माहिती समोर आणली आहे. खाजगी क्षेत्रात काम करणा-या ९०,००० पगारदार करदात्यांनी १,०७० कोटी रुपयांचे चुकीचे कर दावे केल्याचे उघड झालं आहे.

सुमारे ९० हजार पगारदार कर्मचा-यांनी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत चुकीच्या कर कपातीच्या दाव्यांमधून १,०७० कोटी रुपये मिळवले आहेत. अशा लोकांनी चुकीच्या पद्धतीने कर कपातीचे दावे केल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
आयकर विभागाने केलेल्या वेगवेगळ्या शोध, जप्ती आणि सर्वेक्षण ऑपरेशन्स दरम्यान ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. कर्मचा-यांनी इन्कम टॅक्स रिटर्नच्या कलम ८०सी, ८०डी, ८०इ, ८०जी, ८०जीजीसी, ८०जीजीबी अंतर्गत चुकीच्या कर कपातीचा दावा करून त्यांचे कर लाभ घेतले आहेत. असे लोक सार्वजनिक क्षेत्रातील, मल्टी नॅशनल आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांसह विविध क्षेत्रात काम करणा-या संस्थांचे कर्मचारी असल्याचे समोर आलं आहे.