मुंबई : khabarbat News Network
राज्यात लवकरच नवीन इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) धोरण अस्तित्वात येणार आहे. राज्य परिवहन विभागाकडून येत्या तीन महिन्यांत हे धोरण जाहीर करणार असल्याचे राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी सांगितले. अस्तित्वात असलेल्या धोरणाची मुदत ३० मार्चला संपणार आहे. त्यानुसार धोरणाचा आढावा घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात २०२२ मध्ये इलेक्ट्रिक वाहन धोरण लागू करण्यात आले. या धोरणाची मुदत ३० मार्च २०२५ पर्यंत होती. जुन्या धोरणानुसार राज्यात २०२५ पर्यंत एकूण नोंद झालेल्या गाड्यांपैकी १० टक्के आणि २०३० पर्यंत ३० टक्के गाड्या या इलेक्ट्रिक असतील, असे अपेक्षित होते. त्यानुसार ही टक्केवारी जवळपास साध्य झाली असून, २०२४ मध्ये गाड्यांच्या नोंदणीपैकी ९ टक्के गाड्या इलेक्ट्रिक आहेत.