khabarbat

An entire 5-story, 30,000-ton bus station in the Chinese city of Xiamen was moved to another location after obstructing the proposed bullet train route.

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

बुलेट ट्रेनच्या मार्गातील ५ मजली बसस्थानक सरकविण्यात यश!

बीजिंग : वृत्तसंस्था
सहा वर्षांपूर्वी कोरोना आणि आता ‘एचएमपीव्ही’च्या संसर्गामुळे चर्चेत असलेले चीन यावेळी तंत्रज्ञानाच्या अद्भूत गोष्टीसाठी चर्चेत आहे. एखाद्या रेल्वे मार्गात जर कोणतीही मोठी स्थावर इमारत असेल, तर एकतर ती इमारत पाडली जाते किंवा रेल्वेचा मार्ग बदलला जातो. मात्र, चीनच्या ‘झियामेन’ शहरात बुलेट ट्रेनच्या प्रस्तावित मार्गात अडथळा निर्माण करणारे अख्खे ५ मजली आणि ३० हजार टन वजनाचे बस स्थानक ढकलत नेऊन दुस-या ठिकाणी स्थानांतरीत करण्यात आली. ही अद्भूतकामगिरी गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविण्यात आली.

relocation of bust station in china
relocation of bust station in china

असे आहे बस स्थानक…
– हे बस स्थानक २०१५ मध्ये जनतेसाठी खुले करण्यात आले होते. दोन मजले जमिनीखाली व तीन मजले वर असे ५ मजली टर्मिनल आहे.
– २६० युआन म्हणजे ३० दशलक्ष पौंड खर्च करून ५ वर्षात या बस स्थानकाचे बांधकाम करण्यात आले. इमारतीचे वजन ३०,००० टन म्हणजे १५० बोइंग विमानाएवढे आहे. बस स्थानक ५३१ फूट लांब व ११० फूट रूंद आहे.

१० दशलक्ष डॉलरची बचत
– इमारत ढकलण्यासाठी रोलिंग ट्रॅक लावण्यात आले.
– हायड्रोलिक जॅक दररोज १० ते २० मीटर इमारत पुढे सरकवित होते.
– ४० दिवसाच्या कामानंतर अख्खी इमारत ९० अंशाच्या काटकोनात ९४५ फूट सरकविण्यात आली व बुलेट ट्रेनचा मार्ग प्रशस्त करण्यात आला.
– यामुळे वेळ वाचला आणि १० दशलक्ष डॉलरचा खर्च वाचविण्यात यश आले.

Golden Stone | आकाशातून पडला सोनेरी दगड; पॅन्ट जळाली, हात-पाय भाजले!

असे सरकविले अख्खे टर्मिनल…
– नवीनतम वाहतूक योजनेअंतर्गत हाय-स्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्प प्रस्तावित होता. मात्र, ट्रेनच्या मार्गात हे टर्मिनल आडवे येत होते. टर्मिनल पाडावे की हलवावे, अशा अनेक तासांच्या चर्चेनंतर ते हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.
– एवढी जड आणि मोठी इमारत त्वरित हलवणे हे अभूतपूर्व आव्हान आहे. मात्र, चिनी अभियंत्यांनी ते स्वीकारले.
– इमारतीच्या एका बाजुला मध्यबिंदू मानून ते ९० अंशाच्या काटकोनात इमारत सरकविली.
– त्यासाठी कामगारांनी आधी इमारतीच्या ‘पाया’पासूनची माती खोदून काढली. अशाच प्रकारे ज्या नवीन ठिकाणी इमारत ढकलायची होती, तेथीलही माती खोदून काढली.
– पंख्याच्या आकाराच्या भागात जमिनीच्या बाजूने रेलिंग लावले. मग इमारत जमिनीवरून उचलली आणि खाली ५३२ हायड्रॉलिक जॅक लावले.
– हे विशेष हायड्रॉलिक जॅक आहेत जे बांधकामाचा भाग वर ढकलल्यानंतर आपोआप पुढे घेऊन जाऊ शकतात.
– हायड्रॉलिक जॅक दोन गटांमध्ये विभागले होते. पहिला गट वर उठेल व पुढे जाईल आणि दुसरा गट त्याच हालचालींची पुनरावृत्ती करण्यापूर्वी खाली जाईल. यामुळे इमारत ‘चालत’ असल्याचा दृश्य भ्रम निर्माण होईल. या सर्व हालचाली संगणकाद्वारे नियंत्रित करण्यात आल्या.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »