कटिहार : khabarbat News Network
बिहारच्या कटिहार जिल्ह्यात आकाशातून एक सोनेरी रंगाचा दगड आकाशातून पडला जो हातात ठेवल्यानंतर त्याला आग लागली. बासुदेव सिंह नावाच्या व्यक्तीच्या घराच्या अंगणात हा दगड पडला. दगड खाली पडल्यानंतर त्यातून धूर येऊ लागला. त्यामुळे घरातील सगळे सदस्य बाहेर आले तेव्हा अंगणात सोनेरी दगडाचे तुकडे विखुरलेले त्यांनी पाहिले.

प्रत्यक्षदर्शी बासुदेव यांचा मुलगा राजेश म्हणाला की, रविवारी रात्री १० च्या सुमारास आम्हाला काहीतरी खाली कोसळल्याचा आवाज आला. आम्ही अंगणात जाऊन पाहिले तेव्हा सोनेरी रंगाचे दगडाचे तुकडे पडले होते त्यातून धूर येत होता. ही घटना समजताच गावक-यांनी गर्दी केली. त्यानंतर बासुदेव सिंह यांच्या कुटुंबातील लोकांनी हे तुकडे उचलून पाण्याच्या भांड्यात ठेवले. त्यानंतर आणखी धूर येऊ लागला. उल्कापिंडाच्या अवशेषाचा हा भाग असेल असे अनेकजण म्हणू लागले. रविवारी रात्री घडलेली ही घटना सोमवारी जिल्ह्यात सगळीकडे पसरली. लोकांसाठी हे अनोखे दगडाचे तुकडे चर्चेचा विषय बनले.
KGF | कोलारच्या खाणीतून पुन्हा सोन्याची नदी वाहणार!
बासुदेव सिंह यांचा छोटा मुलगा गुल्लू याने पाण्याच्या भांड्यात ठेवलेला दगडाचा एक तुकडा उचलून त्याच्या मित्रांना दाखवण्यासाठी घेऊन जात होता. हा तुकडा त्याने पॅन्टच्या खिशात ठेवताच काही क्षणातच त्याच्या पॅन्टमध्ये आग लागली. गोंधळात त्याने पॅन्ट काढून खिशातून तुकडा बाहेर काढला. दरम्यान, त्याचा हात, पाय, मांडीचा काही भाग भाजला.