khabarbat

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

पोरबंदरला हेलिकॉप्टर अपघात; तिघे जण ठार

पोरबंदर : Khabarbat News Network

गुजरातमधील पोरबंदर येथे असलेल्या तटरक्षक दलाच्या विमानतळावर एक मोठी दुर्घटना घडली आहे. तटरक्षक दलाच्या एअर एन्क्लेव्हमध्ये एक हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाल्याचे तर अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच हा अपघात का झाला, या मागच्या कारणांचा तपास सुरू करण्यात आला आहे.

Read More : KGF | कोलारच्या खाणीतून पुन्हा सोन्याची नदी वाहणार!

या अपघाताबाबत माहिती देताना एका अधिका-याने सांगितले की, भारतीय तटरक्षक दलाचे एक अत्याधुनिक हेलिकॉप्टर ध्रुव रविवारी नियमित प्रशिक्षणासाठी हवेत उड्डाण करत होते. त्याचदरम्यान, त्यामध्ये काही तांत्रिक बिघाड झाला. तसेच हे हेलिकॉप्टर गुजरातमधील पोरबंदर तटरक्षक दल विमानतळावर उतरत असताना दुर्घटनाग्रस्त झाले. या अपघातात हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असलेल्या तीन जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच तटरक्षक दलाचे एक विमान समुद्रामध्ये दुर्घटनाग्रस्त झाले होते. या अपघातानंतर काही महिन्यातच पश्चिम किनारपट्टीवर ही दुर्घटना घडली आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »