khabarbat

A central government report has revealed that nitrates and toxic chemical elements are mixed in the groundwater of 7 districts of the state - Nanded, Beed, and Wardha, Buldhana, Amravati, Yavatmal, and Jalgaon.

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

water pollution | नांदेड, बीडसह ४४० जिल्ह्यातील ३८ कोटी लोकांच्या ओठी नायट्रेटचा घोट

 

लातूर : विशेष प्रतिनिधी
राज्यातील नांदेड, बीड आणि वर्धा, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, जळगाव या ७ जिल्ह्यातील भुजलात नायट्रेट आणि विषाक्त रासायनिक घटक मिसळले असल्याचे केंद्र सरकारच्या अहवालातून निदर्शनास आले आहे.

तथापि, या जिल्ह्यांतील भूजलात नायट्रेट या विषारी रसायनाचे प्रमाण धोकादायक पातळीपेक्षा अधिक असून ते जागतिक आरोग्य संघटना आणि भारतीय मानक ब्युरो यांनी पिण्याच्या पाण्यातील नायट्रेटची मर्यादा ४५ मिलीग्रॅम प्रति लिटर निश्चित केली आहे. मात्र, देशातील एकूण ४४० जिल्ह्यांमध्ये पाण्यातील नायट्रेटचे प्रमाण अधिक आढळले आहे. केंद्रीय भूजल मंडळाच्या वार्षिक भूजल गुणवत्ता अहवाल-२०२४ मध्ये ही माहिती देण्यात आली आहे. अहवालानुसार अभ्यासलेल्या नमुन्यांपैकी २० टक्के नमुन्यांमध्ये नायट्रेटची पातळी मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे निदर्शनास आले.

A central government report has revealed that nitrates and toxic chemical elements are mixed in the groundwater of 7 districts of the state - Nanded, Beed, and Wardha, Buldhana, Amravati, Yavatmal, and Jalgaon.
A central government report has revealed that nitrates and toxic chemical elements are mixed in the groundwater of 7 districts of the state – Nanded, Beed, and Wardha, Buldhana, Amravati, Yavatmal, and Jalgaon.

६ राज्य, १५ जिल्हे रेड झोनमध्ये

महाराष्ट्र : वर्धा, बुलढाणा, अमरावती, नांदेड, बीड, जळगाव आणि यवतमाळ; राजस्थान : बाडमेर, जोधपूर ; तेलंगणा : रंगारेड्डी, आदिलाबाद, सिद्धीपेट; तामिळनाडू : विल्लुपुरम; आंध्र प्रदेश : पलनाडू; पंजाब : भटिंडा रेड झोनमध्ये आहेत. उत्तरप्रदेश, केरळ, झारखंड आणि बिहार ही राज्ये धोक्याच्या उंबरठ्यावर असून अरुणाचल प्रदेश, आसाम, गोवा, मेघालय, मिझोराम आणि नागालँड यांना तूर्त तितकासा धोका नाही.

३८ कोटी लोकांच्या ओठी विषाचा घोट
भारताचा ३७% भूभाग आणि ३८ कोटी लोक नायट्रेटच्या धोक्याच्या कक्षेत आहेत. भारतीय भूजलामधील नायट्रेट प्रदूषणाच्या स्थितीचा अंदाज अमेरिकन केमिकल सोसायटीच्या अहवालात वर्तविण्यात आला आहे. २०२३ मध्ये भूजलाच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी देशभरातून एकूण १५,२५९ स्थळांची निवड करण्यात आली होती.

नायट्रेटयुक्त पाण्याचा धोका

नायट्रेट पाणी किंवा अन्नाद्वारे शरीरात प्रवेश करते. ते तोंड आणि आतड्यांमध्ये असलेल्या जीवाणूंमार्फत ऑक्सिडायझर असलेल्या नायट्राइटमध्ये रूपांतरित होते. नायट्रेट हिमोग्लोबिनमधील आयर्न फॅरसला फॅरिकमध्ये बदलते. यामुळे हिमोग्लोबिनचे रुपांतर मेटाहिमोग्लोबिनमध्ये होते. परिणामी हिमोग्लोबिन अर्थात शरिरातील रक्ताची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता घटते. याशिवाय, नायट्रेटयुक्त पाणी प्यायल्याने पोटाचा, आतड्याचा कर्करोग; ‘ब्लू बेबी सिंड्रोम’; न्यूरल ट्यूब दोष; प्रजनन क्षमतेत घट असे आजार बळावण्याची शक्यता अधिक असते.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »