कर्नूल : khabarbat News Network
एका म्हशीमुळे २ राज्यांमधील गावांमध्ये मोठा संघर्ष पेटला. कर्नाटकच्या बेल्लारी (Bellari) तालुक्यातील बोम्मनहाल गाव आणि आंध्र प्रदेशातील कर्नुल जिल्ह्यातील मेदेहाल गावात एका म्हशीवरून ‘महाभारत’ घडले. या गावातील वाद सोडवण्यासाठी आता म्हशीची (DNA) ‘डीएनए’ चाचणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला परंतु पोलिसांनी या चाचणीविनाच गावातील वादावर तोडगा काढला आहे.

म्हशीच्या मुद्द्यावरून सुरू असलेला दोन सीमाभागातील गावांमधील संघर्ष आता शमला आहे. या महिन्याच्या अखेरीस होणा-या जत्रेत ही (buffalo) म्हैस बळी देण्यासाठी ठेवली होती. ही म्हैस चरत चरत आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील मेदेहाल गावात गेली. त्यानंतर बोम्मनहाल गावातील लोक म्हैस परत आणण्यासाठी गेले असता मेदेहाल गावातील लोकांनी ती परत देण्यास नकार दिला. त्यावरून मोठा वाद पेटला. बोम्मनहाल गावातील लोकांनी या म्हशीची आई आमच्या गावात असून तिचा मालकी हक्क आमच्याकडे आहे असे पोलिसांना सांगितले. त्यानंतर (andhra pradesh) आंध्र प्रदेशातील पोलिसांसह दोन्ही गावातील लोकांची बैठक घेतली. त्यात (karnatak) कर्नाटकच्या गावक-यांना ही म्हैस सोपविण्याचा निर्णय पोलिसांनी दिला. त्यावर दोन्ही राज्यातील गावक-यांची सहमती झाली.