सॅन्फ्रासिस्को : वृत्तसंस्था
भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स मागच्या १८२ दिवसापासून अवकाशात अडकून पडल्या आहेत. आधी सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर हे फेब्रुवारीपर्यंत पृथ्वीवर परततील असे बोलले जात होते. पण आता पुन्हा तारीख बदलली आहे.

Indian-American astronaut Sunita Williams has been stuck in space for the past 182 days. Earlier, it was said that Sunita Williams and Butch Wilmore would return to Earth by February. But now the date has changed again.
अवकाशातून सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना पृथ्वीवर परत आणण्यात अजून विलंब होण्याची शक्यता आहे. अमेरिकन अवकाश संशोधन संस्था नासाने ही घोषणा केली. मार्च २०२५ आधी सुनीता आणि बूच पृथ्वीवर परतणार नाहीत असे नासाकडून सांगण्यात आले. दोन्ही अवकाशवीर मागच्या सहा महिन्यापासून अवकाशात अडकून पडले आहेत. सुनीता विलियम्स ७ ते १० दिवसांच्या मिशनसाठी अवकाशात गेली होती. पण मागच्या १८२ दिवसापासून ती तिथेच अडकून पडली आहे. अवकाशात सुनीता खूप अशक्त झाली आहे. सुनीता आणि बूचसमोर अन्नाचे संकट निर्माण झाले. सहा महिन्यापासून दोघे अवकाशात आहेत.