khabarbat

The decision by the Swiss government has increased the possibility of Nestle's Maggi and other milk products now available in the Indian market becoming more expensive.

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

बच्चे कंपनीची लाडकी Maggi महागणार!

मुंबई : व्यापार प्रतिनिधी
स्वित्झर्लंड सरकारच्या निर्णयामुळे आता भारतीय बाजारात असलेले नेस्लेचे उत्पादन Maggi आणि इतर मिल्ड प्रॉडक्ट (Milk Product) महाग होण्याची शक्यता बळावली आहे. वाढलेला कराचा भार कंपन्या ग्राहकांकडून वसूल करणार आहेत.

The decision by the Swiss government has increased the possibility of Nestle's Maggi and other milk products now available in the Indian market becoming more expensive.
The decision by the Swiss government has increased the possibility of Nestle’s Maggi and other milk products now available in the Indian market becoming more expensive.

‘मम्मी भूख लगी है, बस दो मिनट’, अशी जाहिरात करुन घराघरात स्थान मिळवणारी Maggi महाग होण्याची शक्यता आहे. लहान मुले असो की बॅचलर लोकांच्या जीवनात मॅगीने अनोखे स्थान मिळवले होते. परंतु आता ही Maggi महाग होणार आहे, त्याला कारण भारत सरकार नाही तर स्वित्झर्लंड सरकार आहे. स्वित्झर्लंड सरकारच्या एका नियमामुळे मॅगी महाग होणार आहे.

Maggi महाग होण्याचे कारण भारत आणि स्वित्झर्लंडमध्ये १९९४ मध्ये झालेला एक करार आहे. डबल टॅक्सेशन अवॉइडेंस एग्रीमेंट नावाचा हा करार आहे. त्यात मोस्ट-फेवर्ड-नेशन (MFN) नियम आहे. आता स्वित्झर्लंड सरकार हा नियम १ जानेवारी २०२५ पासून मागे घेणार आहे. त्याला कारण भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेला मोस्ट फेवर्ड नेशनबाबतचा निर्णय आहे. त्यात म्हटले आहे की, मोस्ट फेवर्ड नेशनचा नियम स्वयंचलित पद्धतीने लागू होत नाही, हा लागू करण्यासाठी भारत सरकारच्या अधिसूचनेची गरज आहे.

Onion-Methi Hair Oil a Popular Home Made Remedy from soham gruh udyog, संभाजीनगर. (Aurangabad)
Onion-Methi Hair Oil a Popular Home Made Remedy from soham gruh udyog, संभाजीनगर. (Aurangabad)

एमएफएन नियम द्विपक्षीय कर समझोता आहे. या करारात सहभागी असलेले देश एकमेकांना समान लाभ देतात. स्वित्झर्लंडने आरोप केला आहे की, भारत सरकारने स्लोवेनिया, लिथुआनिया आणि कोलंबिया या देशांना अनुकूल लाभ प्रदान केले. परंतु हे फायदे स्विस कंपन्यांना मिळाले नाहीत. त्यामुळे २०२५ पासून स्वित्झर्लंड सरकार MFN चा दर्जा रद्द करत आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »