khabarbat

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

अदानींच्या खलबतखान्यात महाराष्ट्राच्या नव्या राजकीय मांडणीची तयारी

राज्यातील विधानसभा निवडणूक निकालानंतर पुढील ५ वर्षे कोणतेही ‘भवितव्य’ दिसत नसल्याने शरद पवार गटातील काही खासदार आणि आमदारांनी भाजपसोबत सत्तेत जाण्याची भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यादृष्टीने शरद पवार गट आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा पडद्यामागे वाटाघाटींना सुरुवात झाली आहे.

या गुप्त वाटाघाटींमध्ये पुन्हा एकदा उद्योगपती गौतम अदानी यांचा सहभाग असल्याचे समोर आले. भाजप आणि शरद पवार यांच्यातील प्रत्येक चर्चेत गौतम अदानी यांचे घर जणू कॉमन फॅक्टर ठरले आहे. त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा बदलू शकणा-या या गुप्त राजकीय गाठीभेटी गौतम अदानी यांच्याच ‘खलबतखाना’मध्ये का होतात? भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना गुप्त राजकीय चर्चांसाठी अदानी यांच्या घराच्या चार भिंती इतक्या सुरक्षित का वाटतात?, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Why are the secret political meetings, which could change the course of politics in Maharashtra, taking place in Gautam Adani’s ‘Khalbatkhana’? Why do BJP and NCP leaders feel so safe within the four walls of Adani’s house for secret political discussions? Questions have been raised.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत भाष्य केले. अलीकडच्या काळात गौतम अदानी यांच्या घरी राजकीय बैठका होतात. ते महाराष्ट्राचे भवितव्य ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यांनी मुंबईचे विमानतळ ताब्यात घेतले, ज्यांनी धारावीसह मुंबईची हजारो एकर जमीन गिळली, ज्यांनी महाराष्ट्रातील जकात नाके ताब्यात घेतले, ते गौतम अदानी महाराष्ट्राचे राजकीय आणि सामाजिक भवितव्य ठरवणार आहेत.

संजय राऊत यांच्या टीकेमुळे गौतम अदानी आणि त्यांच्या राजकीय लागेबांध्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी अजित पवार यांनीही २०१९ मध्ये अदानी यांच्या घरी बैठक झाल्याचे म्हटले होते. त्या बैठकीतही शरद पवार आणि भाजपमध्ये युती करण्याविषयी चर्चा झाली होती, हे उल्लेखनिय ठरावे.

शरद पवार गटाने आपले स्वतंत्र अस्तित्व ठेऊन भाजपसोबत सत्तेत सामील व्हावे, असे एका गटाचे म्हणणे आहे. दुसरा गट हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होण्याच्या मताचा आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश आमदार आणि खासदार हे आता सत्तेत सामील होण्याच्या बाजूने दिसत आहेत. तसे झाल्यास राज्यातील महाविकास आघाडीचे अस्तित्व संपुष्टात येईल. थोड्याफार फरकाने अशीच काहीशी पक्षांतर्गत दबावाची परिस्थिती एकनाथ शिंदे यांच्याही पुढ्यात आहे. परिणामी शिंदे हे सत्तेत लाभार्थी असूनही अस्वस्थ आहेत.  एक मात्र खरे की, जे काही राजकीय बदल होतील त्यासाठी पुरेसा वेळ घेतला जाईल. एप्रिल 2025 नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होवू शकतात, त्यावेळी ‘ जोर अजमाईश ‘ केली जाईल. त्यानंतर नेमकी भूमिका घेण्याबाबत विचार केला जावू शकतो.

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटाचे खासदार अजित पवार गटात सामील होतील, अशी चर्चा सुरु होती. या चर्चेचे मूळ आणि पडद्यामागील घडामोडी आता एका पाठोपाठ एक समोर येताना दिसत आहेत. मात्र, शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट काय प्रतिक्रिया देणार, हे पाहावे लागेल. शरद पवार हे भाजपसोबत सत्तेत सामील झाल्यास महाराष्ट्रातील राजकारणाची मांडणी पुन्हा एकदा बदलेल, एवढे मात्र खरे!

– श्रीपाद सबनीस

s4shripad@gmail.com

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »