टेक्सास : News Network
कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे अनेक काम सोपी झाली असली तरी तिचा विघातक परिणाम देखील समोर आला आहे. एका मुलाने त्याच्या एका समस्येवर एआय चॅटबॉटकडे उत्तर मागितले. त्याचे पालक त्याला मोबाईल पाहू देत नव्हते म्हणून त्याने एआय चॅट बॉटला ही समस्या सांगितली तेव्हा AI chat boat (एआय चॅट बोट) ने त्याला आई वडीलांची हत्या कर असा भयानक सल्ला दिला, त्यामुळे खळबळ उडाली आहे.

वास्तविक हे प्रकरण अमेरिकेतील टेक्सास (Texas) येथील आहे. येथील एका तरुणाच्या पालकांनी त्याच्या स्क्रीन टाईमला मर्यादा घालून दिली होती. त्यामुळे त्याने कंटाळून Character.ai या कंपनीच्या चॅटबॉटकडून सल्ला मागितला. चॅटबॉटने या तरुणाला आपल्या आई-वडीलांना मारुन टाक असा जगावेगळा सल्ला देत हेच या समस्येचे उत्तर असल्याचे सांगितले. आता या तरुणाच्या घरच्यांनी या कंपनीविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत हे तंत्रज्ञान हिंसेला प्रोत्साहन देत आहे. जे तरुणांसाठी अत्यंत धोकादायक आहे, असे म्हटले.
कोर्टात दाखविला स्क्रीनशॉट
या प्रकरणात कोर्टात तक्रार गेल्यानंतर सुनावणी वेळी एक स्क्रीनशॉट देखील पुरावा म्हणून दाखविला गेला. त्यात युवक चॅट करताना आई-वडीलांना स्क्रीन टाईम कमी केल्याची तक्रार चॅटबॉटकडे करताना दिसत आहे. यावर (AI chat boat) चॅटबॉटने सल्ला दिला की, अशा अनेक प्रकरणात मुले वैतागून आई-वडीलांना मारतात अशाच बातम्या आहेत, त्यामुळे (AI) एआयने देखील त्याला एक प्रकारे सुचविले की तू पण तेच कर. म्हणजेच एआय चॅटबॉटने याकडे इशारा दिला..
कंपनी विरोधात पिटीशन दाखल करणा-या पालकांचे म्हणणे आहे की, या सर्व प्रकरणाला Character.ai कंपनी जबाबदार आहे. कारण त्यांनीच ही चॅटबॉट सेवा विकसित केली आहे. या आधी फ्लोरिडात याच कंपनीच्या एका एआय चॅटबॉटने चुकीचा सल्ला दिल्याने एका १४ वर्षांच्या मुलाने आपला जीव दिला होता. या प्रकरणात देखील कायदेशीर खटला सुरु आहे.