khabarbat News Network
मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी लागणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र तूर्तास तरी महापालिका निवडणुका लागणार नाहीत, मात्र एप्रिल नंतर या निवडणुका घेतल्या जाऊ शकतात. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अन्य निवडणुका लांबणीवर पडणार आहेत.

अशातच राज्यातील महापालिकेच्या निवडणुकांच्या तारखांसदर्भात एक बातमी समोर आली आहे. राज्यातील महापालिकांच्या निवडणुका एप्रिल महिन्यानंतर लागणार का? असा सवाल केला जात आहे. येत्या २२ जानेवारीला सुप्रीम कोर्टात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत होणा-या सुनावणीवर भवितव्य ठरणार आहे. राज्यात लोकप्रतिनिधींच्या ३४ हजार जागा रिक्त असल्याचेही समोर आले आहे.
दरम्यान, सुप्रीम कोर्टाकडून निकाल देण्यात आल्यानंतर तयारीसाठी किमान तीन महिने लागणार आहेत. त्यामुळे तूर्तास महानगरपालिकांसह नगरपालिका निवडणुक, नगर पंचायती निवडणुक, जिल्हा परिषद निवडणुक आणि पंचायत समितींच्या निवडणुका होण्याची शक्यता नाही. त्यामुळे एप्रिल महिन्यानंतर राज्यातील महापालिकांच्या निवडणुका लागणार असल्याचे बोलले जात आहे.