News Network

ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाविरुद्ध भारतीय महिला क्रिकेट संघात ५ ते ११ डिसेंबर दरम्यान ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. यजमान ऑस्ट्रेलियाने या मालिकेत टीम इंडियाचा सुपडा साफ केला. ऑस्ट्रेलियाने ३ सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाला ३-० ने क्लिन स्वीप केलं. टीम इंडियाला या मालिका पराभवानंतर मोठा झटका लागला. आयसीसीने भारतीय महिला क्रिकेट संघावर मोठी दंडात्मक कारवाई केली असून आयसीसीने सामन्याच्या मानधनाच्या १० टक्के रकमेच्या दंड फर्मावला आहे.
The ICC has taken a major disciplinary action against the Indian women’s cricket team and the ICC has imposed a fine of 10 percent of the match fee. The ICC has taken action against Team India for the slow over rate. Team India failed to maintain the over rate in the second match. According to the rules, it is mandatory to bowl a certain number of overs in an hour. But Team India could not do so. Therefore, the ICC took action.
आयसीसीने टीम इंडियावर स्लो ओव्हर रेटमुळे कारवाई केली. टीम इंडिया दुस-या सामन्यात ओव्हर रेट कायम राखण्यात अपयशी ठरली. नियमांनुसार, एका तासात ठराविक ओव्हर टाकणं बंधनकारक असतं. मात्र टीम इंडिया तसं करु शकली नाही. त्यामुळे आयसीसीने कारवाई केली.
उभयसंघात ब्रिस्बेनमध्ये 8 डिसेंबर रोजी दुसरा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाला निर्धारित वेळेपेक्षा अधिक वेळ लागला. त्यामुळे मॅच रेफरी डेव्हिड गिल्बर्ट यांनी ही कारवाई केली. टीम इंडियाकडून निर्धारित वेळेत 2 ओव्हर कमी टाकल्या गेल्या.
भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हीने झालेली चूक मान्य केली. त्यामुळे अधिकृत सुनावणीची गरज पडली नाही. आयसीसी संहितेच्या अनुच्छेद २.२२ मध्ये स्लो ओव्हर रेटसाठी कारवाईची तरतूद आहे. त्यानुसार प्रत्येक ओव्हरसाठी ५ टक्के रक्कम इतका दंड ठोठावण्याची तरतूद आहे. टीम इंडिया वेळेत २ ओव्हर पूर्ण करु शकली नाही. त्यामुळे टीम इंडियाला १० टक्के दंड ठोठावण्यात आला.
दुस-या सामन्यात काय झालं?
ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर दुस-या सामन्यात १२२ धावांनी विजय मिळवून मालिकेवर नाव कोरलं होतं. ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी ३७२ धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडिया २४९ धावांवर ढेर झाली.