Australia’s parliament has passed a bill to ban social media for children under the age of 16. The bill was supported by both the ruling and opposition parties. Australia is the first country in the world to pass such a bill.

News Network
सेऊल : ऑस्ट्रेलियामध्ये १६ वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याचे विधेयक संसदेने मंजूर केले. या विधेयकाला सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला. असे विधेयक मंजूर करणारा ऑस्ट्रेलिया हा जगातील पहिला देश आहे.
विधेयकानुसार, जर एक्स, टिकटॉक, फेसबुक आणि इन्स्टाग्राम सारखे प्लॅटफॉर्म मुलांना खाती ठेवण्यापासून रोखण्यात अयशस्वी ठरले तर त्यांना २७५ कोटी रुपयांपर्यंत ($३२.५दशलक्ष) दंड होऊ शकतो. पालकांच्या संमतीसाठी किंवा आधीपासून अस्तित्वात असलेल्या खात्यांसाठी कोणतीही सूट दिली जाणार नाही. कायदा लागू झाल्यानंतर, बंदी कशी अंमलात आणायची यावर काम करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी मिळेल.
नक्की वाचा : एक पेंटिंग… ज्यामुळे घडला सीरियात सत्तापालट!
पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनीही या विधेयकाचे समर्थन केले. संसदेत बोलताना अल्बानीजने सोशल मीडियाला तणाव वाढवणारे साधन, ठग आणि ऑनलाइन गुन्हेगारांचे शस्त्र म्हणून संबोधले आहे. ते म्हणाले की, ऑस्ट्रेलियन तरुणांनी फोन सोडून फुटबॉल, क्रिकेट आणि टेनिस खेळावे अशी त्यांची इच्छा आहे.
ब्रिटन बंदी घालणार
ऑस्ट्रेलियानंतर ब्रिटिश सरकार १६ वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याचा विचार करत आहे. ब्रिटनचे तंत्रज्ञान मंत्री पीटर काइल यांनी सांगितले की, ऑनलाइन सुरक्षितता निश्चित करण्यासाठी ते ‘काहीही करतील’ असे ‘बीबीसी’ने म्हटले. विशेषत: मुलांसाठी. स्मार्टफोन आणि सोशल मीडियाचा तरुणांवर होणा-या परिणामांवर अधिक संशोधन करण्याची गरज असल्याचेही पीटर काइल यांनी सांगितले.
१ भारतीय ११ सोशल मीडियावर
रिसर्च फर्म ‘रेडसीर’च्या मते, भारतीय वापरकर्ते दररोज सरासरी ७.३ तास त्यांच्या स्मार्टफोनवर नजर ठेवतात. यातील बहुतांश वेळ ते सोशल मीडियावर घालवतात. तर, अमेरिकन वापरकर्त्यांचा सरासरी स्क्रीन वेळ ७.१ तास आहे आणि चीनी वापरकर्त्यांचा ५.३ तास आहे.अमेरिका आणि ब्रिटनमधील एका व्यक्तीची सरासरी ७ सोशल मीडिया खाती आहेत, तर एक भारतीय किमान ११ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहे.