Khabarbat News Network

मुंबई : आजपर्यंत आडमुठी भूमिका घेतल्यामुळेच मराठा समाजाचे मोठे नुकसान झाले असा आरोप मनोज जरांगे यांचे नाव न घेता करण्यात आला आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागणे यांनी नाव न घेता जरांगे पाटील (Jarange Patil) यांच्यावर असा आरोप केला. मात्र आता समाजाला सत्य सांगणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही लवकरच मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि सकल मराठा बांधव बैठकीचे आयोजन करून निर्णय घेणार असल्याचे नागणे यांनी सांगीतले. या नवीन भूमिकेमुळे आता वादाला फोडणी बसली आहे.
मराठा समाजाला घटनात्मक पद्धतीने ५०% च्या आतून (OBC) ओबीसीमधून आरक्षण द्यावे अन्यथा आम्ही शांत बसणार नाही असा इशारा सरकारला(maratha kranti morcha) मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे. या नवीन भूमिकेवर आता जरांगे पाटील काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या नवीन भूमिकेमुळे मराठा (maratha arakshan) आरक्षणावरून नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे (manoj jarange) पाटील यांनी महायुती सरकारला मराठा आरक्षणाविषयी थेट इशारा दिला आहे. राज्य सरकारला त्यांनी नवीन अल्टिमेटम दिला. येत्या ५ जानेवारी २०२५ पर्यंत मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावावा असा इशारा त्यांनी दिला.