khabarbat News Network
मुंबई : अनेक आमदारांनी मंत्रिपदाच्या यादीत आपला नंबर लागावा म्हणून लॉबिंग सुरू केली आहे. मंत्रिपद देण्यासाठी शिवसेनेच्या शिंदे गटाने एका एजन्सीमार्फत मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड तयार केले. त्यात दोन मंत्री नापास ठरले असून मंत्रिमंडळातून त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेच्या माजी आणि संभाव्य मंत्र्यांचे तसेच इच्छुक आमदारांचे प्रगती पुस्तक शिवसेनेने तयार केले आहे. मंत्रीपदासाठी इच्छुक असलेले पाच आमदार पास झाले आहेत. भरतशेठ गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, विजय शिवतारे आणि अर्जुन खोतकर हे मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मंत्रिपद देणार की वेगळा काही निर्णय घेणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
महायुतीमध्ये शिवसेनेला १३ ते १४ मंत्रिपद मिळणार असल्याची माहीती आहे. यापैकी १० ते १२ मंत्र्यांना याच आठवड्यात मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. शिंदे यांच्या शिवसेनेकडे ६० आमदारांचे बळ आहे. त्यापैकी फक्त १० ते १२ आमदारांनाच मंत्रिपद दिलं जाणार असल्याने आमदार निवडताना एकनाथ शिंदे यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
संभाव्य मंत्री…
गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, शंभूराजे देसाई, तानाजी सावंत, दीपक केसरकर, भरतशेठ गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर आणि विजय शिवतारे.