khabarbat

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

Cold weather | उद्यापासून राज्यभर हुडहुडी जाणवणार!

 

khabarbat News Network

पुणे : सध्या तापमानाचा पारा वाढल्याने किमान तापमानातही वाढ झाल्याचे अनुभवायला मिळत आहे. पुणे शहरामध्ये एका दिवसात चार अंशाने किमान तापमानात घट झाली. परिणामी रविवार दि. ८ डिसेंबर रोजी सकाळ पुणेकरांना जराशी हुडहुडी भरणारी ठरली. पुण्यात रविवारी थंडीत वाढ झाली आणि किमान तापमान १६ अंशावर नोंदवले गेले. थंडीमध्ये आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज सेवानिवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला.

पुरुषांनाही पिरियड्स पाहिजे होते! असे का म्हणाले सुप्रीम कोर्ट वाचा…

रविवारपासून खान्देश, नाशिक (Nashik) पासून थंडीमध्ये हळूहळू वाढ होऊन संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा पुढील १० दिवस म्हणजे बुधवार दि. १८ डिसेंबरपर्यंत थंडी टिकून राहण्याची शक्यता आहे. विदर्भात मात्र थंडीचा परिणाम दोन दिवस उशिराने म्हणजे मंगळवार (दि. १०) नंतर थंडी जाणवेल.

 ‘फेंजल’ चक्रीवादळाने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातील महाराष्ट्रातील थंडी चांगलीच वाढवली होती. आता पुन्हा उत्तर भारतात, मार्गस्थ होत असलेले पश्चिमी वारे व समुद्र सपाटीपासून साडेबारा किमी. उंचीवर वाहणारे उच्च वेगवान पश्चिमी वा-यांचे झोत या मुळे थंडीत वाढ होईल.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »