khabarbat

puja khedkar

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

पूजा खेडकरची खंडपीठात धाव

संभाजीनगर : विशेष प्रतिनिधी
माजी प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर हिने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद (संभाजीनगर) खंडपीठात धाव घेतली आहे. पूजा खेडकर गेल्या वर्षी वादात अडकली. बोगस कागदपत्रांआधारे प्रशासकीय पदाचा फायदा लाटल्याचा तिच्यावर ठपका ठेवण्यात आला. पुण्यात प्रशासनाकडे केलेल्या अवास्तव मागण्यांनंतर ती प्रकाश झोतात आली. त्यानंतर ती आणि तिची आई पण पुढे वादात सापडली.

बोगस प्रमाणपत्रा आधारे आरक्षणाचा लाभ घेतल्याचा तिच्यावर ठपका आहे. युपीएससी परीक्षा देण्यासाठी अतिरिक्त संधी मिळावी यासाठी पूजाने नावात बदल करुन शासनाची फसवणूक केल्याचे समोर आले. त्यानंतर युपीएससीने तिच्यावर गुन्हा दाखल केला. तिचे आयएएस पद रद्द करण्यात आले. ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी आई, वडिलांपासून विभक्त राहत असल्याची कागदपत्रे दिली होती. या सर्वांची छानणी झाली. त्यानंतर तिच्यावर विविध प्रकरणात गुन्हे नोंदवण्यात आले.

बोगस अपंग प्रमाणपत्र मिळवून आरक्षण लाटल्याप्रकरणात पूजा खेडकर हिच्यावर युपीएससीने गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी अटकेपासून संरक्षण मिळविण्यासाठी पूजाने धावा धाव सुरू केली आहे. खोटी प्रमाणपत्र देत अनेकवेळा परीक्षा दिल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आलेला आहे.

खंडपीठात याचिका
विविध प्रकरणात अडकलेल्या पूजा खेडकर हिने आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्हाधिका-यांचा नॉन क्रिमिलिअर संबंधीचा अहवाल रद्द करण्याची विनंती पूजा खेडकरने याचिकेद्वारे केली आहे. यासंबंधीची सुनावणी अहिल्यानगर जिल्हाधिका-यांकडून काढून ती अन्य जिल्ह्यात वर्ग करण्याची विनंती केली आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »