हवाई : वृत्तसंस्था
चीनमध्ये मानवाची एक नवीन प्रजाती सापडली आहे. ही प्रजाती चीनमध्ये ३ लाख ते ५० हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात असावी असा अंदाज आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे, या प्रजातीमधील मानवाचे डोके खूप मोठेहोते. आपले पूर्वज होमो सेपियन्स असल्याचे मानले जाते, पण चीनमध्ये सापडलेले अवशेष यापेक्षा वेगळे आहेत. त्यामुळे ही नवीन प्रजाती कुठून आली, याचा शोध शास्त्रज्ञ घेत आहेत.
A new species of human has been discovered in China. It is estimated that this species may have existed in China between 300,000 and 50,000 years ago. The important thing is that the head of this species is very large. Our ancestors are believed to be Homo sapiens, but the remains found in China are different from this. Therefore, scientists are investigating where this new species came from.
हे होमिनिन्स आधुनिक मानवाच्या आगमनापूर्वीचे आहेत का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. यांचे अस्तित्व ७ ते ३ लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवर असण्याचा अंदाज आहे. सुमारे चार लाख वर्षे त्यांचे पृथ्वीवर अस्तित्व असू शकते. यापूर्वीही जगाच्या कानाकोप-यात मानवाच्या विविध प्रजाती अस्तित्वात होत्या. युरोपमधील होमो हाइडेलबर्गेन्सिस आणि मध्य चीनमधील होमो लाँगी प्रमाणे, हीदेखील प्रगत मानवाची प्रजाती असण्याची शक्यता आहे.
चीनमध्ये सापडलेल्या प्रजातीला शास्त्रज्ञांनी पुरातन होमो सेपियन्स किंवा मध्य प्लेस्टोसीन होमो देखील म्हटले आहे. म्हणजे एकंदरीत ही प्रजाती मध्यम काळातील असण्याचा अंदाज आहे. हवाई विद्यापीठातील मानववंशशास्त्रज्ञ क्रिस्टोफर बे आणि चायनीज अॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या इन्स्टिट्यूट ऑफ व्हर्टेब्रेटचे जीवाश्मशास्त्रज्ञ झिउजी वू यांनी मानवाच्या या नवीन प्रजातीचा शोध लावला आहे. नुकताच त्यांचा अभ्यास या वर्षीच्या पॅलिओअँथ्रोपोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.