अंतरवाली सराटी : विशेष प्रतिनिधी
‘फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिले ती चूक झाली का? आमचे काय चुकले ते मनोजदादांनी एकदा सांगावे, असे आवाहन चंद्रकांत दादांनी केले होते. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर पण हल्लाबोल केला.
चंद्रकांत दादा पाटलांचे काही चुकलं नाही. त्यांनी शेतक-यांना कर्जमुक्ती दिली. शेतक-यांच्या मालाला भाव दिला. शेतक-याला आत्महत्या करायला लावल्या, मराठ्यांना आत्महत्या करायला लावल्या, दहा वर्षांपूर्वीच त्यांनी धनगर समाजाला आरक्षण दिले. म्हाडाचे घरकुल गरीबांना द्यायचे ते त्यांनीच घेतले. खूप चांगले काम केले आहे त्यांनी. मराठ्यांना आरक्षण न देता ओबीसींना दिलं हे चांगलं काम केलं. परत मराठ्यांना ‘एससीबीसी’ आरक्षण देऊन ‘ईडब्ल्यूएस’मध्ये घातलं छान काम आहे. दादांचे मुक्के घ्यायला पाहिजे सगळ्यांनी, लय चांगले काम केले आहे त्यांनी. मराठ्याच्या पोरावर केसेस केल्यात, महिलांना बंदुकीने ठोकलं, गोळ्या घातल्या काय चांगलं काम केलं. देव माणूस आहे दादा, शेंदूर लावायला पाहिजे कोणी फक्त दादाला शेंडी ठेवली पाहिजे उघडी, अशी घणाघाती टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.
फडणवीस भाजप संपवणार
देवेंद्र फडणवीस घरात बसून गणित मांडतात. म्हणून वाटतं हा माणूस खूप छान आहे असं थोडी ढेरी मोठी आहे. नंतर भाजपच्या लोकांना वाटतं हे काय लफडं झालं म्हणून सांगतो हे आरएसएस संपवायला लागला हे भाजप संपवायला लागला. फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे या राज्यातील भाजप संपेल दुसरे कोणामुळे नाही, असे जरांगे म्हणाले.