वाशिम : khabarbat News Network
वाशीम विधानसभा मतदारसंघाचे आमदार लखन मलीक यांना भाजपने दे धक्का दिला. वाशीम मतदारसंघात भाजपने भाकरी फिरवली. अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघातून लखन मलिक यांनी चार वेळा भाजपसाठी विजय खेचून आणला आहे. ते या मतदारसंघातून चार वेळा आमदार झाले.
भाजपने उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर करत आतापर्यंत १२१ जणांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले. यामध्ये काही विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली. तर काही ठिकाणी विद्यमान आमदारांचे तिकीट कापण्यात आले.
वाशीम मतदारसंघात लखन मलिक यांना डालवून भाजपने शाम खोडे यांना उमेदवारी जाहीर केली. खोडे हे भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सचिव आहेत. ही माहिती मिळताच लखन मलिक यांना अश्रू अनावर झाले. पक्ष निष्ठा असताना आपल्याला का डावलण्यात आले असा सवाल करीत या अश्रूंची फुले नव्हे, तर भाले होणार असा इशाराही त्यांनी दिला.