दादर : विशेष प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकांच्या प्रचारतोफा १८ नोव्हेंबर २०२४ रोजी थंडावतात. त्याआधी १७ नोव्हेंबर २०२४ रोजी शेवटचा रविवार आहे. त्यामुळे या दिवशी सर्वच राजकीय पक्षांच्या सभा पाहायला मिळणार आहेत. याच पार्श्वभूमीवर दादरच्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्क म्हणजे शिवाजी पार्क मैदानासाठी चार पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शिवसेना एकनाथ शिंदे गट, भाजप आणि मनसे या चार पक्षांमध्ये शिवाजी पार्क मैदान प्रचारासाठी मिळावे यासाठी चुरस रंगली आहे. या चारही पक्षांकडून १७ नोव्हेंबरसाठी अर्ज दाखल करण्यात आला. १८ नोव्हेंबरला प्रचार तोफा थंडावत असल्याने १७ नोव्हेंबरला मैदान मिळावं, यासाठी चढाओढ सुरु आहे. या मैदानासाठी सर्वात पहिल्यांदा अर्ज मनसेकडून आला, त्यामुळे मनसेच्या सभेला परवानगी मिळावी, अशी मागणी मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी केली आहे.
The campaign guns for assembly elections go cold on November 18, 2024. The last Sunday before that is November 17, 2024. Therefore, meetings of all political parties will be seen on this day. Against this backdrop, a tug-of-war is going on between four parties for the historical Chhatrapati Shivaji Maharaj Park i.e. Shivaji Park ground in Dadar.
जेव्हा एकाच दिवसासाठी आणि एकाच ठिकाणासाठी अनेक पक्ष अर्ज देतात, तेव्हा प्रथम अर्ज देणा-यांना प्राधान्य दिले जाते आणि आमचा अर्ज सर्वात प्रथम देण्यात आला होता. नेहमीप्रमाणे आमचा अर्ज पहिला आलेला आहे. त्यामुळे हे मैदान सभेसाठी आम्हालाच मिळणार’, असे यशवंत किल्लेदार म्हणाले.