कोल्हापूर : khabarbat News Network
ज्योतिबा डोंगर येथील श्री दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील भाविक येत आहेत. आज रविवार व चौथी माळ असल्याने गर्दीने डोंगर खचाखच भरला. ‘ज्योतिबाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषाने डोंगर दुमदुमला.
आज करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन परराज्यातील भाविकांच्या झुंडीच्या झुंडी डोंगरावर आल्या. यामध्ये महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती. आज नवरात्र उत्सवातील चौथा दिवस त्यामुळे मंदीरातील समईमध्ये तेल घालण्यासाठी या भाविकांनी मोठी गर्दी केली. तसेच काहींनी कडाकण्या अर्पण केल्या. आज (सोमवारी) दिवसभर कडक उन्हात भाविकांच्या झुंडी ज्योतिबा डोंगरावर येत राहिल्या.