khabarbat

Advertisement

संभाजीनगर, जालन्यासह १३३७ रेल्वे स्थानकांची पुनर्बांधणी

 

नाशिक | khabarbat News Network 

देशात १,३३७ रेल्वे स्टेशनची पुनर्बांधणी करण्याची कामे हाती घेतली आहेत. त्यात सर्वाधिक कामे महाराष्ट्रात होत आहेत. मुंबई सीएसएमटी रेल्वे स्थानकाची पुनर्बांधणी होत आहे. तसेच अजनी, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर, हडपसर, इतवारी, जालना, लासलगाव, नांदगाव, खेडगाव (सोलापूर), हातकणंगले, ग्रँट रोड यासारख्या अनेक रेल्वे स्थानकांचे रेल्वे डिझाईन तयार झाले आहे.

हे पण वाचा : विमानापेक्षा सुसाट, पुणे-मुंबई काही मिनिटांत! 

संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात ११०० कोटींची रेल्वेची कामे होत होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ हजार कोटी रुपये महाराष्ट्राला मंजूर केले आहेत. नाशिक आणि पुणे या शहरांना रेल्वेने जोडण्यासाठी भूसंपादनाचे काम सुरु होते. परंतु या प्रकल्पाच्या कामाने वेग घेतला नाही. नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प पुढे नेण्यासाठी एक अडचण निर्माण झाली आहे. ती सोडवली जात असून त्यानंतर प्रकल्पाच्या कामाला वेग येणार आहे, असे सांगितले.

हटके बातमी वाचा : अखेर सोन्याचे घुबड मिळाले!

पुण्यात चार रेल्वे टर्मिनल झाल्यानंतर पुण्याची रेल्वे क्षमता वाढणार आहे. पुणे येथे नारायणपूर, खोडा येथे ४३ देशांनी प्रकल्प केला आहे. नाशिक – शिर्डीवरुन दक्षिण भारत गाठता येईल, यासाठी नवीन योजना तयार केली जात आहे. नाशिक रोड रेल्वे स्टेशन नव्याने तयार होणार आहे. येथे रेल्वेची जमीन वापरून कोल्ड स्टोरेज उभारण्याचा प्रस्ताव अनेकांनी दिला आहे. त्यावर विचार सुरु आहे, असेही अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

हे देखील वाचा : ‘… चांगभलं’च्या गजराने ज्योतिबा डोंगर दुमदुमला!

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »