पॅरिस । News Network
फ्रान्समध्ये मागच्या ३१ वर्षांपासून एका सोन्याच्या घुबडाचा शोध घेतला जात होता. त्या घुबडासाठी जागोजागी उत्खनन सुरू होतं. अखेर या घुबडाला जमिनीतून बाहेर काढण्यात यश आलं आहे.
डिस्कॉर्ड फोरमवर मिशेल बेकर नावाच्या एका व्यक्तीने म्हटले की, सोनेरी घुबडाला शोधून काढण्यात आलं आहे, अशी आम्ही अधिकृत घोषणा करतो. हे घुबड जमिनीतून खोदून बाहेर काढण्यात आलं आहे. त्यामुळे आता या घुबडाच्या शोधात कुठेही खोदकाम करू नका.
Flying Train | विमानापेक्षा सुसाट, पुणे-मुंबई काही मिनिटांत!
फ्रान्समधील एक कादंबरीकार मॅक्स व्हॅलेंटाइन यांनी २३ एप्रिल १९९३ रोजी एका गुप्त ठिकाणी सोन्याच्या घुबडाची पितळेची प्रतिकृती लपवली होती. त्यांनी आपल्या कादंबरीमध्ये घुबडापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सांगितला होता. त्यासाठी ११ कोडी घालण्यात आली होती. त्यात गणितासंबंधीचे काही प्रश्न होते. काही शाब्दिक खेळ आणि इतिहासाबाबतच्या गोष्टी होत्या.
या घुबडाला शोधून आणणा-या व्यक्तीला सोन्याचं घुबड बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली होती. २००९ मध्ये मॅक्स व्हॅलेंटाइन यांचा मृत्यू झाला, तेव्हा मिशेल बेकर यांनी या मोहिमेची जबाबदारी सांभाळली होती.