मुंबई । khabarbat News Network
Pune-Mumbai within few minutes! अहमदाबाद मार्गावर बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरु आहे. ही बुलेट ट्रेन ३२० किलोमीटर वेगाने धावणार आहे. परंतु १,००० किलोमीटर वेगाने ट्रेन धावल्यास मुंबई ते नागपूर हे अंतर एका तासापेक्षा कमी वेळेत गाठले जाईल. अशी ट्रेन भारतात आली तर पुणे-मुंबई अंतर काही मिनिटांत पूर्ण करेल.
चीनने नुकतेच हायस्पीड ट्रेनची चाचणी यशस्वी केली आहे. या चाचणीनुसार ही ट्रेन १,००० किलोमीटर प्रति तास वेगाने धावणार आहे. अल्ट्रा हाय स्पीड मॅग्लेव ट्रेन तासाला १,००० किलोमीटर वेगाने धावत आहे.
Global Times च्या रिपोर्टनुसार अल्ट्रा हाय-स्पीड ट्रेन लो-व्हॅक्यूम ट्यूब मॅग्लेव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टम अंतर्गत विकसित करण्यात आली आहे. ट्रायल रनमध्ये ही ट्रेन ताशी १,००० किलोमीटर वेगाने धावण्यात यशस्वी ठरली आहे. या प्रकल्पावर काम करणा-या अधिका-यांनी या चाचणीमुळे संपूर्ण प्रणालीच्या दक्षतेची माहिती मिळाल्याचे म्हटले आहे. या प्रकल्पाला सक्षम म्हटले गेले आहे.