संभाजीनगर : khabarbat News Network
MIM claims on 28 seats | महाविकास आघाडीत MIM ला सोबत घेण्यासाठी इम्तियाज जलील यांनी आघाडीतील दोन प्रमुख पक्षाला लेखी प्रस्ताव पाठवला. यात काँग्रेस आणि शरद पवार गटाचा समावेश आहे. विशेष म्हणजे एक आणि दोन ऑक्टोबर रोजी देखील जलील यांची महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत बैठक झाली आहे असे जलील यांनी सांगितले. जलील यांनी २८ जागा एमआयएमला मिळाव्यात अशी मागणी त्यांनी मविआला केली आहे.
महत्वाची बातमी : Flying Train | विमानापेक्षा सुसाट, पुणे-मुंबई काही मिनिटांत!
जलील यांनी आपण महाविकास आघाडीत जाण्यास तयार आहोत असे सांगितले आहे. त्याबाबत आपल्याला लेखी प्रस्ताव देण्यासाठी सांगण्यात आले होते.
हे पण वाचा : Golden Owl | ३१ वर्ष फ्रान्समध्ये उत्खनन, अखेर सोन्याचे घुबड हाती !
पुणे कॅन्टोन्मेंट, सोलापूर सेंट्रल, अकोट, बालापुर, अकोला पश्चिम, वाशिम, अमरावती, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पूर्व, धुळे शहर, मालेगाव मध्य या मतदार संघावर शिवाय मुंबई ठाण्यातल्या १५ जागांवर दावा केला आहे. या २८ जागांची यादी दिली असली तरी गरज पडल्यास काही जागांवर तडजोड करण्याची तयारी एमआयएमची आहे असेही जलील यांनी स्पष्ट केले आहे.