मुंबई : khabarbat News Network
Sharad Pawar ready to support central govt. | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्र सरकारला पाठिंबा देण्याची तयारी असल्याचे महत्वाचे विधान केले आहे. आरक्षणाच्या मुद्यावरून महत्वाचं वक्तव्य केलं आहे.
‘ आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा. आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांवरून 75 टक्क्यांवर न्या’ असं शरद पवार म्हणाले. ‘ केंद्राने मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतल्यास आमचा पाठिंबा असेल’असंही त्यांनी स्पष्ट केलं. विधेयक आणल्यास आम्हीही केंद्राला पाठिंबा देऊ, असं शरद पवार म्हणाले.
आरक्षणाच्या बाबतीत असे आहे की 50 टक्क्यांच्यावर जाता येत नाही. 50 ट्क्क्यांच्या वर आरक्षण जर हवं असेल तर संसदेत कायदेशीर दुरूस्ती केली पाहिजे. काय हरकत आहे दुरुस्ती करायला? आत्ता 50 टक्के आरक्षण आहे ते 75 टक्क्यांपर्यंत जाऊ दे.
महाराष्ट्रात 75 टक्के का होऊ शकत नाही? म्हणजे आता 50 % आहे, 75% होण्यासाठी 25 ने वाढवावं लागेल. 25 % वाढवले की ज्यांना मिळालं नाही त्यांचा विचार करता येईल, जिथं कमी आहे त्यांच्याबद्दलही विचार करता येईल.यामध्ये केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा , संसदेत विधेयक आणावं.आम्ही त्यांना साथ देऊ, असं शरद पवार म्हणाले.