कानपूर : khabarbat News Network
e-device will diagnose mouth cancer : भारतासह जगभरात मुख कर्करोग हा च्ािंतेचा विषय बनला आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, २०२० मध्ये मुख कर्करोग झाल्यामुळे एकूण १,७७,७५७ लोकांनी आपला जीव गमावला. हा जागतिक स्तरावर १३ वा सर्वात सामान्य कर्करोग आहे. भारतात याचे प्रमाण जास्त आहे, कारण येथील लोक मोठ्या संख्येने गुटखा आणि पान मसाला यासारख्या गोष्टी खातात.
आयआयटी कानपूरने एक डिव्हाईस तयार केले आहे. या डिव्हाईसच्या मदतीने मुख कर्करोग त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात शोधला जाऊ शकतो. हे डिव्हाईस डिसेंबर २०२४ पर्यंत बाजारात दाखल होईल अशी शक्यता वर्तविली जात आहे.
प्रोफेसर जयंत कुमार सिंह हे आयआयटी कानपूर येथील केमिकल इंजिनिअरिंग विभागातील वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत. आयआयटीने कानपूर शहरातील जवळपास ३ हजार लोकांवर या डिव्हाईसची टेस्ट केली. ज्यामध्ये शालेय लोक, रुग्णालयातील कर्मचारी आणि कारखान्यातील कामगारांचा समावेश आहे. प्रोफेसर जयंत कुमार सिंह यांच्या म्हणण्यानुसार, मुख कर्करोग पहिल्या टप्प्यातच आढळला, तर या आजाराला ब-याच अंशी प्रतिबंध करणे शक्य आहे.
IIT Kanpur has developed a device. Oral cancer can be detected in its early stages with the help of this device. The device is expected to hit the market by December 2024.