khabarbat

Advertisement

American Dock Workers Strike | अमेरिकी बंदर कामगार संपावर; जागतिक बाजारपेठेला महागाईची भीती

 

– अमेरिकेचे दररोज ५ अब्ज डॉलर्स नुकसान

– १९७७ नंतर पहिलाच प्रसंग

– ५० हजार कामगार संपावर

– जगभरातील सामान्यांच्या खिशाला फटका बसणार

नवी दिल्ली । khabarbat News Network

American Dock Workers On Strike : अमेरिकेत ५० हजाराहून अधिक बंदर कामगारांनी संप पुकारला आहे. देशात १९७७ नंतर ही पहिलीच वेळ आहे, ज्यात इतक्या मोठ्या संख्येने कामगार आंदोलनात उतरले आहेत. ही बंदरे अमेरिकेच्या एकूण उलाढालीत ४० टक्के वाटा उचलतात. या संपामुळे अमेरिकेला दरदिवशी ५ अब्ज डॉलर पर्यंत नुकसान सहन करावे लागत आहे. कराराच्या वाटाघाटी अयशस्वी झाल्यामुळे बंदर कामगार संपावर गेले आहेत.

सध्याच्या कंत्राटानुसार यूनियन मेंबर्सला प्रत्येक तासाला २० ते ३७ डॉलर पैसे दिले जातात. ते पुढील ६ वर्षात त्यात ३२ टक्के वाढ मागत आहेत. सध्या अमेरिकेत सुमारे ३८ टक्के आयात पूर्व आणि आखाती किनारपट्टीच्या बंदरांमधून येते.

जेपी मोर्गननुसार, या संपामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर दररोज ३.८ ते ४.५ अब्ज डॉलरपर्यंत नुकसान होऊ शकते. विशेषत: कृषी उत्पादनाच्या आयातीसाठी हे बंदर महत्त्वाचे आहेत. जर हा संप असाच सुरू राहिला तर पु्न्हा एकदा खाद्यान्नाच्या किमतीत वाढ होऊन महागाई वाढू शकते.

महत्वाची बातमी : https://khabarbat.com/2024/10/02/nandini-gets-tirupatis-contract/

या बंदरांमधून माल आयात करणा-या कंपन्यांमध्ये वॉलमार्ट, आयकेइए, होम डेपो, डॉलर जनरल आणि अ‍ॅमेझॉन यांचा समावेश आहे. याशिवाय निर्यातीची बाजारपेठही मोठ्या प्रमाणावर या बंदरांवर अवलंबून आहे. या बंदरांमधून १९.१ लाख टन माल चीनला निर्यात केला जातो.

या संपामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसू शकतो. अलिकडच्या काळात अमेरिकेतील हा सर्वात मोठा संप आहे. चीन आणि पाकिस्तानसह जगातील अनेक देशांवर याचा परिणाम होऊ शकतो.

New Delhi | More than 50,000 port workers have gone on strike in America. This is the first time since 1977 that such a large number of workers have gone on strike in the country. These ports account for 40 percent of the total turnover of the United States. Due to this strike, the US has to bear losses of up to 5 billion dollars per day.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »