बैरुत : वृत्तसंस्था
इस्रायलने हिजबुल्लाहच्या म्होरक्याला मारण्यासाठी थेट लेबनॉनची राजधानी बैरुतवरच हल्ले केले आहेत. दहशतवाद्यांना आपली भूमी वापरू देण्याची शिक्षा आता लेबनॉनी लोकांना भोगावी लागत आहे. हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाह मारला गेला तरी देखील इस्रायलने लेबनॉनवर हल्ले सुरुच ठेवल्याने तेथील नागरिक हादरले आहेत. Lebanese fled to the syrian border
लेबनॉनचे सैन्य आणि सरकार इस्रायलला प्रतिकार करायचे सोडून गायब झाले असल्याचे आरोप करत हे लोक आपला देश सोडू लागले आहेत. लेबनॉनी लोक शनिवारी रात्रीपासून बचावासाठी सिरियाच्या सीमेवर पोहोचले आहेत. इस्रायली हल्ल्यांना घाबरून हे लोक पलायन करत आहेत.
इस्रायलची विमाने कधी येतील आणि बॉम्ब टाकून जातील याची शाश्वती नसल्याने लेबनॉनी नागरिकांनी रात्र रस्त्यावर काढली. बैरुतमधील एक बहुमजली इमारत इस्रायली हवाई दलाने केलेल्या भीषण बॉम्बस्फोटात जमीनदोस्त झाली. या इमारतीच्या तळघरात हिजबुल्लाह प्रमुख हसन नसराल्लाह आणि संघटनेचे इतर प्रमुख कमांडर उपस्थित असल्याचा दावा इस्रायलने केला होता. तो खरा ठरला आहे. Lebanese Latest News
लेबनॉनने पाच दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. सर्व दुकाने, सरकारी-खासगी कार्यालये २ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.