मुंबई : khabarbat News Network
आयडीएफसी फर्स्ट बँक आणि ‘आयडीएफसी’ लिमिटेडचे विलीनीकरण पूर्ण झाले आहे. या विलीनीकरणामुळे भागधारकांना फायदा होणार आहे. ‘आयडीएफसी’च्या प्रत्येक भागधारकाला १०० शेअर्सच्या बदल्यात ‘आयडीएफसी’ बँकेचे १५५ शेअर्स दिले जातील. या विलीनीकरणामुळे ‘आयडीएफसी’ ची कॉर्पोरेट रचना अधिक चांगली होणार आहे. या सोबतच प्रवर्तकांचे होल्डिंग कमी होणार आहे.
The merger of IDFC First Bank and ‘IDFC’ Limited has been completed. The merger will benefit shareholders. Each shareholder of IDFC will be given 155 shares of IDFC Bank in exchange for 100 shares.
‘आयडीएफसी’ फर्स्ट बँकेने शुक्रवारी हे विलीनीकरण पूर्ण झाल्याची घोषणा केली. शेअरधारक आणि नियामकांच्या मंजुरीनंतर पुढील महिन्यापासून हे विलीनीकरण लागू केले जाईल, असे बँकेने म्हटले आहे. ‘आयडीएफसी’ने शेअर्सच्या देवाणघेवाणीसाठी १० ऑक्टोबर ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. हे शेअर्स ३१ ऑक्टोबरपूर्वी भागधारकांना दिले जातील.
या विलीनीकरणामुळे सर्वात मोठा फायदा हा होणार आहे की, बँकेची कोणतीही होल्डिंग कंपनी राहणार नाही. या विलीनीकरणामुळे बँकेला सुमारे ६०० कोटी रुपये मिळणार आहेत.