नवी दिल्ली | khabarbat News Network
जगातील सर्वाधिक तरुण मंडळी असलेल्या देशांपैकी एक म्हणून काही वर्षांपूर्वी भारताकडे पाहिले जात होते. जगातील भारत हा चौथा युवा देश आहे. भारत हळू-हळू वार्धक्याकडे मार्गस्थ होत आहे.
जगातील युवा पिढीच्या यादीत नायजेरिया पहिला देश आहे, तर फिलिपिन्स दुसरा आणि बांगलादेश तिसरा देश ठरला आहे. १४० कोटी लोकसंख्या असलेला भारत चौथ्या क्रमांकावर आहे. भारतातील तरुणांच्या वयाची सरासरी काही वर्षांपूर्वी २४ वर्षे होती ती आता वाढून २९ वर्षांवर आली आहे.
भारताच्या लोकसंख्येचा वाढीचा दर २०२४ मध्ये १ टक्क्यांवर आला आहे. हा दर १९५१ नंतरचा सर्वात कमी आहे. १९७२ मध्ये लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक म्हणजे २.२ टक्क्यांवर होता. भारतात अखेरची जनगणना ही २०११ मध्ये झालेली आहे. तेव्हा देशाची लोकसंख्या ही १२१.१ कोटी एवढी होती. SBI च्या अहवालानुसार ती वाढून आता १४२ कोटींवर गेली आहे.
२०३६ मध्ये वृद्धांची संख्या ही एकूण लोकसंख्येचा १२.५ टक्के होणार आहे. ४० टक्के ज्येष्ठ नागरिकांची लोकसंख्या BPL च्या खाली असणार आहे. १८.७ टक्के ज्येष्ठ नागरिकांकडे उत्पन्नाचा कायमस्वरूपी स्रोत नसेल. यामुळे सरकारला या लोकांसाठी निवारा, हॉस्पिटल, वैद्यकीय उपकरणे, स्वस्त दरात अन्न-धान्य उपलब्ध करणे आदी गोष्टी उभाराव्या लागणार आहेत.