khabarbat

Budget 2025 will be the first full budget of Narendra Modi government's third term. This will be the eighth budget in a row for Finance Minister Nirmala Sitharaman.

Advertisement

India Budget 2025 | अर्थव्यवस्थेत ६.७ टक्के दराने वाढ अपेक्षित; आगामी बजेटची तयारी सुरू

नवी दिल्ली : khabarbat News Network
केंद्र सरकार लवकरच पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. आर्थिक व्यवहार विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, वित्त मंत्रालय ऑक्टोबरच्या दुस-या आठवड्यापासून २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया सुरू करेल. भारतीय अर्थव्यवस्थेने सलग चार आर्थिक वर्षांत सात टक्के किंवा त्याहून अधिक वाढ नोंदवली आहे.

The Budget 2025-26 will focus on increasing the pace of growth, job creation and demand in the economy. Budget 2025 will be the first full budget of Narendra Modi government’s third term. This will be the eighth budget in a row for Finance Minister Nirmala Sitharaman. No woman Finance Minister before Nirmala Sitharaman has achieved such a record.

या परिपत्रकात असे म्हटले आहे की, २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात प्रगतीचा वेग, रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेतील मागणी वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. २०२५ चा अर्थसंकल्प हा नरेंद्र मोदी सरकारच्या तिस-या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासाठी हा सलग आठवा अर्थसंकल्प असेल. निर्मला सीतारामन यांच्यापूर्वी कोणत्याही महिला अर्थमंत्र्यांनी असा विक्रम केला नाही.

अर्थव्यवस्थेत ६.७ टक्के दराने वाढ अपेक्षित
२०३०-३१ या आर्थिक वर्षात भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे. आघाडीची अमेरिकन रेटिंग एजन्सी एस अँड पी ग्लोबलच्या अहवालात हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ६.७ टक्के दराने वाढण्याची अपेक्षा असल्याचे रेटिंग एजन्सीने म्हटले आहे. ‘एस अ‍ॅँड पी’ने अहवालात म्हटले आहे की, आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये खाजगी क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सार्वजनिक भांडवलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सतत सुधारणांची आवश्यकता आहे.
तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »