२६०० कोटी रुपये ‘फ्रिज’; हिंडेनबर्गचा दावा
बर्न | स्विस अधिका-यांनी अदानीच्या मनी लॉन्ड्रिंग आणि फसवणुकीच्या तपासाचा भाग म्हणून अनेक बँक खात्यांमध्ये जमा केलेले ३१ कोटी डॉलर्स (सुमारे २६०० कोटी रुपये) गोठवण्यात आले असल्याचा दावा करत हिंडेनबर्गने पुन्हा एकदा अदानी समूहावर हल्लाबोल केला. २०२१ पासून ही चौकशी सुरू असल्याचेही म्हटले. हिंडेनबर्गने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट शेअर केली असून अदानी समूहाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
Hindenburg once again hit out at the Adani group, claiming that Swiss authorities had frozen $310 million (about Rs 2,600 crore) deposited in several bank accounts as part of an investigation into Adani’s money laundering and fraud. Hindenburg shared the post on social media platform ‘X’ and an explanation was given by the Adani Group.
अदानी समूहाच्या प्रवक्त्याने हे आरोप निरर्थक, अतार्किक आणि बिनबुडाचे असल्याचे सांगत स्विस कोर्टाच्या कोणत्याही कार्यवाहीत अदानी समूहाचा सहभाग नाही आणि आमच्या कंपनीचे कोणतेही खाते कोणत्याही प्राधिकरणाने गोठवलेले नाही, असे म्हटले आहे.
हिंडेनबर्गचा दावा काय…
अदानी समूहाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग आणि सिक्युरिटीज फ्रॉडच्या आरोपांच्या चौकशीचा एक भाग म्हणून स्विस अधिका-यांनी सहा स्विस बँक खात्यांमध्ये जमा केलेली ३१ कोटी डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम गोठवली असल्याचा आरोप हिंडेनबर्गने केला. अमेरिकन शॉर्टसेलर हिंडेनबर्ग ग्रुपने नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या स्विस क्रिमिनल कोर्टाच्या रेकॉर्डचा हवाला देत ही माहिती दिली. २०२१ पासून सुरू असलेल्या या तपासात भारतीय समूहाशी संबंधित संशयित ऑफशोर कंपन्यांशी संबंधित आर्थिक व्यवहारांवर प्रकाश टाकण्यात आल्याचेही हिंडेनबर्गने म्हटले.