khabarbat

khabarbat logo

Join Us

Communist Party of India (CPI-M) General Secretary Sitaram Yechury passed away. Sitaram Yechury breathed his last at the age of 72 at the AIIMS Hospital in Delhi.

Advertisement

CPI (M) नेते सीताराम येचुरी यांचे निधन

नवी दिल्ली | भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय-एम) सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे निधन झाले. सीताराम येचुरी यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. येचुरी यांना फुफ्फुसात संसर्ग झाल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक दिवस डॉक्टरांचे पथक त्याच्यावर उपचार करत होते.

New Delhi | Communist Party of India (CPI-M) General Secretary Sitaram Yechury passed away. Sitaram Yechury breathed his last at the age of 72 at the AIIMS Hospital in Delhi. He was undergoing treatment at AIIMS hospital for the past few days. Yechury is said to have a lung infection. A team of doctors treated him for several days.

सीताराम येचुरी यांचा जन्म १९५२ मध्ये चेन्नई येथे तेलुगू ब्राह्मण कुटुंबात झाला होता. त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्रात बीए आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून एमएची डिग्री मिळवली. सीताराम येचुरी १९७५ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य झाले. १९७५ मध्ये येचुरी जेएनयूमध्ये शिकत असताना आणीबाणीच्या काळात त्यांना अटक करण्यात आली होती. कॉलेजमधूनच ते राजकारणात आले. जेएनयू विद्यार्थी संघटनेचे ते तीन वेळा अध्यक्ष म्हणून निवडून आले. सीताराम येचुरी यांना २०१५ मध्ये प्रकाश करात यांच्यानंतर सीपीएमचे सरचिटणीस बनवण्यात आले. पक्षाचे ज्येष्ठ नेते दिवंगत हरकिशन सिंग सुरजीत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणाची सुरुवात केली होती.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »