केप कॅनव्हेराल | अब्जाधीश उद्योजक जेयर्ड इसाकमन यांनी पुन्हा एकदा अंतराळात झेप घेतली. अंतराळात प्रथमच खासगी पद्धतीने स्पेसवॉक करण्याच्या उद्देशाने जेयर्ड यांनी ही अंतराळ मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेसाठी त्यांनी space X सोबत खर्च सामायिक केला आहे. स्पेससूट विकसित करणे व त्याची चाचणी घेणे हा मोहिमेचा उद्देश आहे.
सर्व काही नियोजनाप्रमाणे व ठरल्यानुसार झाले, पहिल्यांदाच एखादा नागरिक अंतराळात स्पेसवॉक करण्याचा विक्रम नोंदवू शकणार आहे. मात्र, हा स्पेसवॉक करताना इसाकमन हे कॅप्सूलपासून दूर जाणार नाहीत.
spacewalk हा अंतराळ उड्डाणातील सर्वात धोकादायक भाग मानला जातो. यापूर्वी १९६५ मध्ये सोवियत संघाच्या विघटनापूर्वी रशियाने अंतराळात यानाची हॅच अर्थात जाळी उघडली होती. रशियानंतर अमेरिकेने यानाचे हॅच उघडले होते. तेव्हापासून खासगी अंतराळवीर याकडे आवडीचे क्षेत्र म्हणून पाहतात.
इसाकमन Isakman यांनी मंगळवारी पहाटे दोन स्पेसएक्स अभियंत्यासोबत व एका माजी हवाई दल थंडरबर्ड वैमानिकासोबत Florida येथून spaceX 9 रॉकेटने अंतराळात उड्डाण केले. या ५ दिवसांच्या अंतराळ यात्रेत जेयर्ड इसाकमन स्पेसवॉक करू शकतात.
आंतरराष्ट्रीय अंतराळ (ISS) स्थानकापासून पुढे १ हजार ४०० किलोमीटर उंचीपर्यंत अंतराळवीर जेयर्ड (Jared Isakman) अंतराळ यात्रा करू शकतात. ही यात्रा यशस्वीरित्या पूर्ण झाली तर जेयर्ड हे १९६६ मध्ये नासाच्या जेमिनी प्रकल्पादरम्यानचा विक्रम मोडतील. चंद्रावर गेलेल्या २४ अपोलो मोहिमेतील अंतराळवीरांनीच यापुढे अंतर पार केले आहे.